राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.पोलीस अधिक्षक कार्यालयात विविध विषयावर त्यांची बैठक होत आहे. बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुणे रेव्ह पार्टी, हनी ट्रॅप, विरोधकांकडून होणारे आरोप, रोहिणी खडसेंच्या भूमिकेवर भाष्य करत निशाणा साधलायं. पुण्यातील क्राईम ब्रँच डेप्युटी निखिल पिंगळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे ज्या पद्धतीची ही पार्टी होती, ती म्हणजे तरुणाईला नशेकडे घेऊन जाणाऱ्या या पार्ट्या आहेत समाजाला कीड लावण्याचं काम या माध्यमातून होत असतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ड्रग्सच्या विरोधातील मोहीम प्रखर केली आहे , याबाबत पोलीस कठोर कारवाई करतील असे मला विश्वास पण अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना घडताना त्या राजकीय घरातून घडत आहेत.त्यामुळे ज्या पक्षाचे यामध्ये लोक आहेत, त्यांच्यावरही लगाम बसला पाहिजे समाजामध्ये आपण प्रतिनिधित्व करत असताना आपलं वर्तन अनुकरण करावं, असा असलं पाहिजे राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून माझा संविधान, घटनेवर आणि कायद्यावर विश्वास आहे.पोलिसांनी प्रेस घेऊन सर्व घटनाक्रम मांडला आहे. त्यांना तपासासाठी काही अवधी देणं गरजेचं आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.