फोटो सौजन्य - Social Media
भारतात सैय्यारा चित्रपटाचा एक आगळावेगळा ट्रेंड सुरु झाला आहे. या चित्रपटातील गाणे लोकांच्या तोंडावर घर करून जात आहेत. अनेकांच्या तोंडामध्ये सैय्यारा चित्रपटाची गाणी दिसून येतातच. इंस्टाग्रामवर सैय्याराच्या रील्सचा तुफान आला आहे. लोकं अगदी या चित्रपटासाठी वेडे झाले आहेत. सैय्यारा सिनेमाचा वेड इतका भयंकर आहे की काही प्रेक्षक तर एकदा नव्हे तर अनेकदा तोच तोच चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. अशामध्ये सैय्यारा चित्रपटाचा टायटल सॉंग ‘सैय्यारा’ संबंधित एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
मुळात, चित्रपटाच्या शीर्षक गीताला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यात भावना अगदी भरभरून आहेत. सैय्यारा गाण्याचे गायक तसेच गीतकार तनिष्क बागची याने या गाण्याबद्दल महत्वाचे विधान केले आहे. त्याचे असे म्हणणे आहे की त्याने हे गाणे त्याच्या रुसलेल्या प्रेयसीसाठी लिहलेले होते, ज्या वेळी तो हे गाणे तयार करत होता तेव्हा तो नैराश्यात होता. मुळात, त्याचे असे म्हणणे आहे की या गाण्यात माफी आहे, त्याच्या भावना आहेत तसेच दुःख आहे. या सगळ्या खऱ्या भावना मिळून हे गाणे तयार झाले आहे.
तानिष्क बागची एक प्रसिद्ध म्युजिक कम्पोजर असून त्याने बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणे दिले आहेत. शेरशाह चित्रपटातील ‘रातां लंबिया’ गाणे असू दे किंवा ‘अख लड जावे’, अशा अनेक गाण्यांमधून त्याने चाहत्यांना वेड लावले आहे. तानिष्कचे ‘सैय्यारा’ गीत त्याच्या सर्वात जास्त गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याने इंस्टग्राम अगदी हालवून टाकले आहे.
सैय्यारा चित्रपटाने UK मधले मोडले रोकोर्ड
मोहित सुरी दिग्दर्शित भावनिक प्रेमकथा सैयारा सध्या युनायटेड किंगडममध्ये बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे. चित्रपटाने आपल्या दुसऱ्या आठवड्यात GBP 1.016 मिलियनचा गल्ला जमवला असून, ही रक्कम दुसऱ्या आठवड्यात भारतीय चित्रपटाने मिळवलेली सर्वाधिक आहे. यापूर्वी शाहरुख खानच्या पठाणने GBP 938K कमावले होते. सैयारा हा दुसऱ्या आठवड्यात GBP 1 मिलियनचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. आहान पांड्य आणि अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एक हृदयस्पर्शी प्रेमकथा दाखवण्यात आली असून, याचा प्रेरणास्रोत 2004 चा कोरियन चित्रपट अ मोमेंट टू रिमेंबर आहे. भारतातही सैयाराने केवळ 14 दिवसांत ₹280.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. यामुळे विकी कौशलच्या छावासारख्या आंतरराष्ट्रीय यशस्वी चित्रपटाचाही विक्रम त्याने मागे टाकला आहे.