Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संगीत मानापमान’मध्ये पाहायला मिळणार अमृता खानविलकरच्या नृत्याची झलक, मोहमयी नजाकतीने वेधलं लक्ष

मराठी इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध डान्सिंग स्टारसपैकी एक असलेल्या अमृता खानविलकर एक आहे. सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान" चित्रपटात ती "वंदन हो" या सुरेख गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 01, 2025 | 07:15 PM
'संगीत मानापमान'मध्ये पाहायला मिळणार अमृता खानविलकरच्या नृत्याची झलक, मोहमयी नजाकतीने वेधलं लक्ष

'संगीत मानापमान'मध्ये पाहायला मिळणार अमृता खानविलकरच्या नृत्याची झलक, मोहमयी नजाकतीने वेधलं लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

तिच्या लावण्या असो किंवा रिऍलिटी शोमधले सादरीकरण. अभिनेत्रीसह अमृता एक उत्तम नृत्यांगनादेखील असल्यामुळे तिने सादर केलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. अमृताने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे आणि ह्यावेळी सुद्धा सुबोध भावे दिग्दर्शित आगामी ‘संगीत मानापमान” चित्रपटात ती पुन्हा एकदा आपली कला सादर करणार आहे.

सिनेमात असलेलं सुरेख गाणं “वंदन हो” मध्ये आपण अमृता खानविलकरला सेमी क्लासिकल डान्स करताना पाहू शकतो. अमृता हि शास्त्रीय नृत्य करण्यात माहीर आहे तिने खूपच मोहमयी नजाकतीने ह्या गाण्यात नृत्य केलय. ट्रेलर मध्ये तिची एक झलक पाहूनच तिचे चाहते खूप उत्सुक होते. तिची अदा पाहून सर्वेच तिच्यावर फिदा होतात ह्यात काही शंका नाही. चित्रपटातील “वंदन हो” ह्या गाण्याला आणखी सुरेख बनवलं ते म्हणजे कोरिओग्राफर दीपाली विचारे ह्यांनी. मध्यप्रदेशच्या ओरछा येथे हे संपूर्ण गाणं दोन दिवसांत शूट झालंय.

तारक मेहतातल्या भिडे मास्तरच्या लेकीने बांधली लग्नगाठ, Video सोशल मीडियावर व्हायरल…

अमृताने वंदन हो गाण्याबद्दल आपलं मत मांडताना सांगितलं “वंदन हो हे माझं गाणं संगीत मानापमानची भव्यता उत्तम प्रकारे कॅप्चर करतं. हे गाणं एक व्हिज्युअल ट्रीट आहे. माझ्या आणि दीपाली विचारे आम्हा दोघांचा उत्कृष्ट असा सुपरहिट गाण्याचा इतिहास आहे कारण तिने चंद्रमुखी मधील चंद्रा देखील कोरिओग्राफ केलं आहे, जे ३ ते ४ वर्षानंतर देखील गाजतंय आणि पुढे हि गाजणार आणि आता मानापमान सारख्या संगीतमय चित्रपटामुळे मला दीपा ताईच्या हाताखाली खूप काही शिकायला मिळालंय, ती कथ्थकची उस्ताद आहे आणि तिने जे वंदन हो गाण्यामध्ये केलय ते पूर्णपणे आश्चर्यकारक आहे. गाण्यात मध्य प्रदेशातील सुंदर लोकेशन आणि आम्ही चित्रित केलेला राजवाडा अगदी थक्क करणारा आहे. नचिकेत बर्वे नी गाण्याचे कॉस्ट्यूम डिझाईन केलेत जे अप्रतिम आहे. तसेच गाण्याचे सिनेमॅटोग्राफर सुधीर भालानी ह्यांनी सुद्धा कायम लक्षात राहील असं काम केलय”

 

क्रिकेटर शिखर धवनचे ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचे स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल, फोटोंमागील नेमकं सत्य काय ?

‘संगीत मानापमान’ चित्रपटाविषयी बद्दल सुद्धा अमृता म्हणाली की “संगीत मानापमानचा भाग होणे आणि शंकर एहसान लॉयच्या म्युझिक साठी सोलो परफॉर्म करणे म्हणजे कट्यार काळजात घुसलीच्या सर्व आश्चर्यकारक आणि अद्भुत आठवणी परत आणते. तीच टीम आहे आणि सुबोध कट्यारनंतर पुन्हा दिग्दर्शन करत आहे. त्याने मला ह्या चित्रपटासाठी विचारलं ज्यात तो केवळ दिग्दर्शनच नाही तर त्यात अभिनय देखील करत आहे, त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी अद्भुत, खास आणि हृदयाच्या जवळ आहे त्यात जिओ स्टुडिओज सिनेमा प्रोड्युस करत असल्यामुळे माझा गेस्ट अपिअरन्स आणखी स्पेशल झालाय.”

इतकंच नव्हे तर दिग्दर्शक, अभिनेता आणि खास मित्र सुबोध बद्दल सुद्धा अमृताने सांगितलं “सुबोध मला त्याच्या कोणत्याही चित्रपटात काम करण्याबद्दल विचारतो तेव्हा मी कधीच नाही म्हणू शकत नाही कारण त्याने मला सुमारे ७ ते ८ वर्षांपूर्वी कट्यार काळजात घुसली दिलं होतं, जो सर्वात उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. त्याचं आणि माझा बॉण्ड घट्ट आहे. तो मला नेहमी असं काम देतो जे माझ्या करिअर साठी नक्कीच एक पाऊल पुढे असतं.

“मुशाफिरीनं मागचं वर्ष माझ्यासाठी…” २०२४ वर्षासाठी लिहिलेल्या अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. ‘संगीत मानापमान’ १० जानेवारी २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

Web Title: Subodh bhave sangeet manapman movie vandan ho song released on social media this song perform on dance amruta khanvilkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • marathi film
  • subodh bhave

संबंधित बातम्या

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
1

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
2

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
3

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

बायोपिक्सचा सम्राट सुबोध भावे आता ‘नीम करोली बाबा’ यांच्या भूमिकेत!
4

बायोपिक्सचा सम्राट सुबोध भावे आता ‘नीम करोली बाबा’ यांच्या भूमिकेत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.