लेकीच्या प्रेग्नेंसीबद्दल सुनील शेट्टीचं महत्वाचं विधान, काय म्हणाला अभिनेता ?
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी लवकरच आजोबा होणार आहेत. ही गुड न्यूज मिळाल्यापासून ते खूपच खुश आहेत. अभिनेत्याची मुलगी अथिया शेट्टीने काही महिन्यांपूर्वीच ती आई होणार असल्याची घोषणा केली होती. नुकतंच अभिनेत्याने एका कार्यक्रमामध्ये आपल्या लेकीबद्दल आणि त्याच्या अपकमिंग चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता ‘हेरा फेरा ३’मुळे चर्चेत आहे. कार्यक्रमामध्ये अभिनेत्याने आपल्या आगामी चित्रपटाबद्दलही भाष्य केले आहे.
वऱ्हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची जोरदार क्रेझ…
एका कार्यक्रमादरम्यान, सुनील शेट्टीने मुलगी अथिया शेट्टीच्या गरोदरपणाबद्दल भाष्य केले की, “अथिया लवकरच आई होणार आहे. २०२५ मध्ये माझ्यासाठी ही पाहण्यासारखी सर्वोत्तम गोष्ट असेल. आथिया कायमच आपल्या कोणत्याही गोष्टींवर फोकस आणि जास्त सजग असते. तिला जी गोष्ट हवी आहे, ते तिला माहिती आहे. सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीने भारताचा स्टार क्रिकेटर के.एल.राहुलला डेट केल्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले. यानंतर, या सेलिब्रेटी कपलने ८ नोव्हेंबर २०२४ रोजी लवकरच आई-बाबा होणार असल्याची सर्वांनाच गोड बातमी दिली. दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, ‘आमचा सुंदर आशीर्वाद लवकरच येत आहे.’ अथिया तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांत आहे आणि ती लवकरच आई होणार आहे. सुनील शेट्टी देखील आजोबा झाल्याबद्दल खूप आनंदी आहे.
सुनील शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सुनील लवकरच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानच्या ‘नादानियां’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात इब्राहिमसोबत श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरदेखील आहे. शिवाय, सुनील बहुप्रतिक्षित ‘हेरा फेरी ३’ चित्रपटातही दिसणार आहे. त्याने या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि तो याबद्दल खूप उत्सुक असल्याचंही म्हटला आहे. प्रेक्षकही त्याच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण त्याच्या मागील दोन भागांनी बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती.
‘स्वप्नातली परी की तिखी छूरी…?’ ब्रेकअप नंतर तमन्नाचा कातिलाना Look “कतई जहर…”
‘हेरा फेरी ३’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सुनील शेट्टी यांनी ‘हेरा फेरी ३’ बद्दल सांगितले की, फक्त प्रियदर्शन (हेरा फेरी ३ चे दिग्दर्शक) ‘हेरा फेरी ३’ बनवू शकतात. त्याला विनोद खूप चांगला समजतो आणि तो स्वतः त्याच्या पटकथेवर काम करत आहे. जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले की, चाहते या चित्रपटातून काय अपेक्षा करू शकतात, तेव्हा त्याने ‘ब्लॉकबस्टर’ असे उत्तर दिले. तथापि, हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. सध्या चाहते त्याचे शूटिंग सुरू होण्याची वाट पाहत आहेत.