YRKKH Actress Samridhii Shukla Suffers Minor Burn Injury During Cooking Scene
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुख्य म्हणजे, ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका म्हणून ओळखली जातेय. मालिकेच्या सुरुवातीपासून, मालिकेतील अनेक पात्रांमध्ये आणि कथानकात अनेक बदल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी, कथानकात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यानंतरही शोने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान राखलेय. सध्याच्या पात्रांबद्दल बोलायचे झाले तर, समृद्धी शुक्ला देखील या शोचा एक भाग आहे, जी अभिराच्या भूमिकेत दिसते. तिच्याबद्दल एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे.
कान्सनंतर नशीबच पालटलं… अभिनेत्री छाया कदम यांना बड्या ज्वेलरी ब्रँडची खास ऑफर
टेलिव्हिजन अभिनेत्री समृद्धी शुक्ला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेचं शूटिंग करत असताना तिचा अपघात झाला आहे. शुटिंग दरम्यान, अभिनेत्री कुकिंग सीनवेळेस झालेल्या घटनेत समृद्धीचा हात भाजल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्रीचा हात आत भाजला नसून ही घटना ७ मार्चला मालिकेच्या सेटवर घडल्याचे वृत्त आहे. यामुळे समृद्धीच्या चाहत्यांना तिची चिंता वाटली. पण विशेष म्हणजे हात भाजलेला असूनही समृद्धीने शूटिंग करणं सोडलं नाही. यामुळे तिचं चांगलंच कौतुक होतंय.
“कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला?” अभि नेत्याचा भोपाळच्या मंदिरातला ‘तो’ व्हिडीओ बघून चाहते हैराण
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर कुकिंगच्या सीनदरम्यान हा अपघात घडला. खरंतर, मालिकेत अभिरा अरमानची आवडती डिश कचोरी बनवत होती. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या ट्रॅकनुसार अभिरा कचोरी बनवत होती. मालिकेत सध्या समृद्धी-अरमान यांच्या फर्स्ट वेडींग ॲनिव्हर्सरीचा ट्रॅक सुरु आहे. त्यामुळे मालिकेत अभिराच्या कचोरी बनवत होती. समृद्धीला उकळत्या तेलात कचोरीला फ्राय करायचं असतं. याच सीनच्या शूटिंगदरम्यान तेल तिच्या अंगावर आल्याने तिचा हात थोडासा जळाला.
सलमान खानचा Sikandar रिमेक की ओरिजनल ? दिग्दर्शक ए.आर. मुरुगदासने जरा स्पष्टच सांगितलं…
अभिनेत्रीचा हात भाजला असला तरीही, अभिनेत्रीने अद्यापही शूटिंग थांबवलेली नाही. तिने मालिकेतली शूटिंग पूर्ण केली. हातासोबतच तिच्या कपाळावर तेलाचे काही थेंबही उडाले होते. पण आता ती अभिनेत्री पूर्णपणे ठीक आहे. इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत समृद्धी म्हणाली की, “थोडं गरम तेल माझ्या अंगावर आल्याने माझा हात जळाला. मला एखादा पदार्थ डीप फ्राय करायची कोणतीच आयडिया नव्हती. मला वाटतं की, मी चांदीचा चमचा घेऊन जन्माला आली आहे. माझ्या आई-बाबांनी मला याविषयी कधी काही सांगितलं नाही, त्यामुळेच ही घटना घडली. परंतु आता सर्व सुरक्षित आहे.” हात भाजूनही शूटिंग सुरु ठेवल्याने समृद्धीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.