
सूरज चव्हाणच्या नावाने लुबाडणूक, पोस्ट शेअर करत म्हणाला; "फसवणूक करणाऱ्याला शिक्षा..."
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण झाला आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेल्यापासून त्याच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. शिवाय त्याच्या चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर सूरज चव्हाणच्या नावाखाली एक फसवणूक केली जात आहे. अशी फसवणूक करणाऱ्या लोकांपासून जरा सावधान असं आव्हान सूरजने आपल्या चाहत्यांना केले आहे. नेमकं काय प्रकार आहे ? कशा पद्धतीने सूरजच्या नावाखाली चाहत्यांची फसवणूक केली जात आहे, जाणून घेऊया…
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचं विजेतेपद पटकवल्यानंतर सूरजच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचा आकडा वाढू लागला आहे. एका छोट्याशा गावातून आणि एका गरीब घरातून आलेल्या सूरजने फार हालाकीचे दिवस काढले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला सूरज आता प्रसिद्धीचं शिखर गाठायला सुरूवात केली आहे. त्याची घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्याला काही लोकं आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली लोकं गैरफायदा घेत आहेत. त्याच्यानावाचा वापर करून काही फ्रॉड लोकं सामान्य लोकांची फसवणूक करीत आहेत. यासंदर्भात सूरजने पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
सूरज चव्हाणच्या नावाने लुबाडणूक, पोस्ट शेअर करत म्हणाला; “फसवणूक करणाऱ्याला शिक्षा…”
सूरज पोस्टमध्ये लिहितो, “नमस्ते मी आपल्या महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण. मागील काही तासांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून, त्यामध्ये आम्ही सूरजला आर्थिक मदत करणार आहोत…दिलेला कोड स्कॅन करून पैसे पाठवा. त्याच्यापर्यंत निश्चित ही आर्थिक मदत आम्ही पोहोचवू… अशा पद्धतीच्या या सगळ्या पोस्ट आहेत. माझ्या नावाचे फेक आयडी बनवून या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तरी अशा फेक पोस्टला फॅन्सनी बळी पडू नये ही माझी विनंती आहे. जे कोणी अशा पोस्ट शेअर करत आहेत…त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘झापूक झुपूक’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाची निर्मिती जियो स्टुडिओज करणार असून हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होईल. ग्रँड फिनालेनंतर रितेशने सूरजची भेट घेऊन त्याला मदतीसाठी मॅनेजर देणार असल्याचं सांगितलं होतं. नुकतंच, सूरजने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेशी त्यांनी त्याला “शिक्षण पूर्ण कर, बँकेत खातं उघड” असा सल्ला दिला. शिवाय त्याच्यासाठी २ बीएचके घरही ते देणार आहेत.