'कांगुवा'साठी सूर्याला मिळालं इतक्या कोटींचं मानधन; बॉबी देओल, दिशा पटानी सोडाच बॉलिवूड स्टारलाही टाकलं मागे
टॉलिवूडचा सुपरस्टार सूर्याचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘कांगुवा’ ची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. शिवा दिग्दर्शित ‘कांगुवा’ हा चित्रपट 300 ते 350च्या बजेटमध्ये निर्मित केला गेला आहे, त्यामुळे या चित्रपटाचे यश खूप महत्त्वाचे आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये बॉलिवूडसह टॉलिवूडमधली तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. बिग बजेट चित्रपटामध्ये कलाकारांनी किती मानधन घेतले आहे, जाणून घेऊया…
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सूर्याच्या आगामी ‘कांगुवा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये अभिनेता दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता एकदम खतरनाक अंदाजात दिसत असून त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्याने चित्रपटासाठी ३९ कोटी रूपये मानधन स्वीकारले. तर त्याच्या विरोधात चित्रपटात बॉबी देओल दिसत आहे. बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या लूकचीही सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. त्याने चित्रपटासाठी ५ कोटी मानधन घेतल्याची चर्चा होत आहे.
दिशा पाटनीनेही चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. तिने ३ कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचे बोलले जात आहे. ‘कांगुवा’ हा जगभरात चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाला 10 भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 300 ते 350च्या बजेटमध्ये निर्मित केलेल्या या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे हजारो तिकिटं विकले गेले असून कोट्यवधींची कमाई केलेली आहे. आगाऊ बुकिंगमध्ये चित्रपटाचे सर्वाधिक तिकिट दक्षिण भारतातील विकले गेलेले आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे, हा चित्रपट जगभरात १०,००० हून अधिक स्क्रिन्सवर एकाच दिवशी रिलीज होणार आहे.