(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रंगीला सारख्या हिट चित्रपटांसाठी स्मरणात राहणारे राम गोपाल वर्मा चित्रपटांपेक्षा वादांमुळेच जास्त चर्चेत असतात. आता अलीकडील प्रकरण कायदेशीर वादाशी संबंधित आहे. RGV या नावाने ओळखल्या जाणाऱ्या निर्मात्याविरुद्ध प्रकाशम जिल्ह्यातील मड्डीपाडू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नक्की प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात.
चंद्राबाबू नायडूंवर निशाणा साधला
आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व त्याच्या थ्रिलर चित्रपट ‘व्यूहम’च्या प्रमोशनदरम्यान करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. टीडीपीचे विभागीय सचिव रामलिंगम यांनी ही तक्रार दाखल केली असून, राम गोपाल वर्मा यांनी सीएम नायडू, त्यांचा मुलगा नारा लोकेश, सून ब्राह्मणी आणि तेलुगू देसम पक्षाच्या इतर सदस्यांसह अनेक टीडीपी नेत्यांच्या प्रतिष्ठेला सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याचा आरोप केला आहे.
हे देखील वाचा- रुपाली गांगुलीने मानहानीचा खटला दाखल करताच ईशा वर्माने केले हे कृत्य, जाणून व्हाल चकित!
राम गोपाल वर्मा यांनी खोट्या बातम्या पसरवल्या
मद्दीपाडू उपनिरीक्षक शिवा रामय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलिंगमच्या आरोपांच्या आधारे त्याच्यावर आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चुकीची माहिती पसरवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचा आरोप दाखल केला आहे.
हे देखील वाचा- ‘पुष्पा’साठी अल्लू अर्जुन नाही तर ‘हा’ अभिनेता होता फर्स्ट चॉईस…
या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वीही अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती
‘व्यूहम’ हा चित्रपट सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार होता, पण त्याला अनेक वादांचा सामना करावा लागला. निवडणुकीच्या काही आठवडे आधी मार्चमध्ये तो प्रसिद्ध झाला. त्याची ही सोशल मीडिया पोस्ट चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग होती. त्याच्या रिलीज दरम्यान, टीडीपीने वर्मा यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये नायडूंच्या कुटुंबाला लक्ष्य करू नये म्हणून सावध केले होते. वर्मा यांनी यापूर्वी लोकेश आणि सध्या राज्यात उपमुख्यमंत्रीपद भूषविणारे जनसेना नेते पवन कल्याण यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यामुळे ते संकटात सापडले होते.