प्रेम, मिस्ट्री आणि एका प्रेम कहाणीचा अंत; अशी सुरू झाली होती सुशांत- रियाची प्रेमकहाणी
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड असलेल्या रिया चक्रवर्ती हिचा आज वाढदिवस आहे. (Rhea Chakraborty Birthday News) अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा जन्म १ जुलै १९९२ रोजी बंगळुरूमध्ये झाला. सुशांत सिंह राजपूतसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत चर्चेत राहिलेल्या रिया चक्रवर्तीने तिच्या फिल्मी करियरची सुरुवात २००९ सालापासून केली. २००९ साली रियाने छोट्या पडद्यावरील MTV रियालिटी शो TVS Scooty Teen Diva मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने एमटीव्हीचे अनेक शो होस्ट केले.
“ही मुलगी माझी कशी असू शकते…” ४७ % मिळवणाऱ्या अभिनेत्याच्या लेकीला बोर्डात मिळाले ९७ %
आज रियाच्या वाढदिवसानिमित्त सुशांत सिंह राजपूतसोबतच्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत. या दोघांची पहिली भेट कधी आणि कुठे झाली जाणून घेऊया…. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतची पहिली भेट २०१३ साली झाली होती. त्यावेळी सुशांत ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र होता. त्यानंतर रिया ‘अपने पिता की मारुती’ या चित्रपटात काम करत होती. दोन्ही चित्रपटांचे सेट जवळपास होते. रिया आणि सुशांत तेव्हा पहिल्यांदाच भेटले होते. यानंतर रिया आणि सुशांत अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र भेटायचे. यातूनच त्यांची मैत्री झाली. कायमच भेटत असल्यामुळे त्यांची मैत्री अधिकच घट्ट होत गेली. दोघांचीही मैत्री खूपच चांगली असल्यामुळे त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले.
झी मराठीच्या ‘या’ मालिकेत विद्या बालनची एन्ट्री, अभिनेत्रीने मालिकेतल्या नायिकेला दिले मोलाचे सल्ले…
मोबाईल नंबर एक्सचेंज केल्यानंतर त्यांच्यातल्या भेटीगाठी आणखी वाढत गेल्या. त्यांच्यातल्या मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात होऊ लागले. एका मुलाखती दरम्यान रियाने सांगितलेले की, ज्यावेळी तिची आणि सुशांतची मैत्री झाली होती. त्यावेळी सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता. तरीही तो रियासोबत संपर्कात होता. सुशांत २०१७- १८ च्या काळामध्ये एका प्रॉडक्शन हाऊसमधून वेगळा झाल्यानंतर आणि वेगवेगळ्या बॅनरसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनीही रिलेशनशिपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या जाण्यानंतर रिया चक्रवर्ती लाईमलाईटमध्ये आली. रिया चक्रवर्ती आणि सुशांत अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते.
मृत्यूच्या दिवशी तिने फ्रिजमधलं खाल्ल अन्न…; शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर!
पण, सुशांत- रियाच्या प्रेमकथेचा शेवट असा होऊ शकतो, असा विचार कोणीही केला नव्हता. दरम्यान, रिया चक्रवतीला भेटण्यापूर्वी सुशांत सिंह राजपूत टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. सुशांतच्या आयुष्यात जेव्हा रियाने प्रवेश केला तेव्हा त्याच्या आणि अंकिताच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. याच कारणामुळे सुशांत रियाच्या जवळ येत राहिली आणि अंकितासोबतचे ६ वर्ष जुने नातेही तुटले. सुशांतच्या निधनानंतर त्याचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, रियाने सुशांतला कुटुंबापासून दूर नेले आणि त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. किशोर सिंहने सांगितले की, रियाने सुशांतला आपल्या ताब्यात घेतले होते. सुशांत वारंवार नंबर बदलायचा. त्याच्या क्रेडिट कार्डपासून ते सर्व आयडी पासवर्ड रियाने जप्त केले होते. कुटुंबीयांनाही त्याला भेटू दिले नाही.