Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुयश टिळक- आयुशी भावेचं नातं फिस्कटले? अभिनेत्याच्या ‘त्या’ इन्स्टा पोस्टमुळे उडाली खळबळ

काही तासांपूर्वीच सुयश टिळकने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याने त्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने एक ऑडिओ सुद्धा वापरला आहे. पोस्टमधील ऑडिओ ऐकून अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 08, 2025 | 09:46 PM
सुयश टिळक- आयुशी भावेचं नातं फिस्कटले? अभिनेत्याच्या 'त्या' इन्स्टा पोस्टमुळे उडाली खळबळ

सुयश टिळक- आयुशी भावेचं नातं फिस्कटले? अभिनेत्याच्या 'त्या' इन्स्टा पोस्टमुळे उडाली खळबळ

Follow Us
Close
Follow Us:

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि छोटा पडदा गाजवणारा सुयश टिळक कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. अभिनेत्याने आपल्या कुशल अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर निर्माण केलं आहे. सुयश एक सुप्रसिद्ध अभिनेता असून तो कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती शेअर करत असतो. याशिवाय, अभिनेता निसर्गसंवर्धन आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफीविषयीच्या पोस्ट देखील तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्याने चाहत्यांना धक्का दिला आहे.

“एकादशीच्या दिवशी माझ्या मित्रांनी…”, मराठमोळ्या अभिनेत्याने वारीमध्ये सहभागी होता न आल्याने व्यक्त केली खंत

काही तासांपूर्वीच अभिनेत्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने एक ऑडिओ सुद्धा वापरला आहे. शेअर केलेल्या पोस्टमधील ऑडिओ ऐकून अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. पोस्टमध्ये अभिनेता स्वत:ला सिंगल असल्याचं म्हणत आहे का, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली आहे. ऑडिओमध्ये असं ऐकू येतं की, “हा फोटो मी सिंगल असतानाचा आहे…” यानंतर काही क्षणांसाठी शांतता असते आणि मग पुन्हा आवाज येतो… “हाहाहाहाहा…. कशाची वाट पाहताय? मी अजूनही सिंगलच आहे.” या ऑडिओमुळे सुयश अजूनही अविवाहित असल्याचं स्पष्ट करत आहे का, असा प्रश्न चाहत्यांना उपस्थित झाला आहे.

 

ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’

अभिनेत्याच्या घटस्फोटाची चर्चा काही पहिल्यांदा होत नाही. गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवशीही घटस्फोटाची चर्चा रंगली होती. त्याची पत्नी आयुषी भावे हिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये काही फिसकटलं असल्याची चर्चा झाली होती. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सुयश आणि आयुषीने आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरूवात केली होती. त्या दोघांचीही पहिली ओळख एका ब्यूटी क्वीन स्पर्धेत झाली होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली. त्यांनी एकमेकांसोबतचे फोटोही सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत. आयुषी किंवा सुयशने अद्याप ते दोघेही वेगळे झाले आहेत किंवा त्यांचा घटस्फोट झाला आहे, याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही.

सुयशने काही तासांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा सुयश आणि आयुषीच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. सुयशच्या ह्या क्रिप्टिक पोस्टमुळे हे गूढ अधिकच वाढलं आहे.

Web Title: Suyash tilak shared i am still single post with aayushi bhave fans shocks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

Video : “एक नंबरा मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात
1

Video : “एक नंबरा मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात

मराठमोळ्या आशिष वारंगचा जगाला अलविदा! हिंदी चित्रपटातही दाखवली होती चमक
2

मराठमोळ्या आशिष वारंगचा जगाला अलविदा! हिंदी चित्रपटातही दाखवली होती चमक

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
3

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
4

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.