marathi actor abhijeet kelkar not able to attend this year ashadhi wari shared video on instagram
अलीकडेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ‘आषाढी एकादशी’ मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली गेली. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी शहरापासून अगदी छोट-छोट्या खेड्यापाड्यांपर्यंत अनेक लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून पंढरपुरात दाखल झाले होते. विठुरायाच्या दर्शनासाठी सामान्य नागरिकच नाही तर, सेलिब्रिटी मंडळीही यावेळी शक्य असेल तिथे वारीमध्ये दाखल झाले होते. छाया कदम, हार्दिक जोशी, सायली संजीव, सायली पाटील यांसह अनेक टीव्ही सीरियलमधील कलाकार या वारीत सहभागी झाले होते. कलाकारांनी सोशल मीडियावर वारीतील खास क्षण शेअर केले होते. पण एका अभिनेत्याची वारीमध्ये सामील होण्याची इच्छा अपुरी राहिली असून त्याने याबद्दलची इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत केळकर आहे. तो कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता, अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओसोबतच अभिनेत्याने त्याच्या यंदाच्या वारीत सहभागी न होता आल्याबद्दलच्या भावनाही कॅप्शनच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.
‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिसाद, अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सकडून भरभरून कौतुक
शेअर केलेल्या व्हिडिओला अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काही क्षण शब्दांपलीकडचे असतात… ह्या वर्षी वारीला जायची खूप इच्छा होती पण काही कारणांमुळे शक्य नाही झालं. ह्या वर्षी पांडुरंगाच्या मनात नाही म्हणून त्याने आपल्याला बोलावलं नाही अशी मी मनाची समजूत घातली पण त्याच्या मनात काही वेगळं होतं… परवा एकादशीच्या दिवशी माझ्या मित्रांनी मुलुंडमध्ये दिंडीचं आयोजन केलं होतं. त्यात नाटकाच्या प्रयोगाला जायच्या आधी मी सहभागी झालो, त्यात काही छोटी छोटी मुलं विठोबा, रखुमाई, तुकाराम महाराज अशा रूपात तयार होऊन आली होती. दिंडीबरोबर चालत होती, कंटाळली होती, दमली होती… मी नाचताना त्यातल्या विठोबाकडे माझं लक्ष गेलं कारण त्याच्या आईने त्याला उचलून घेतलं होतं… मग मी त्यांना विनंती करून, विठोबाचे थोडे लाड करून त्याला उचलून खांद्यावर बसवलं आणि नाचायला लागलो, हळूहळू त्या विठोबाने माझ्या डोक्यावर डोकं ठेवलं, हाताने माझा चेहरा घट्ट धरला आणि थोड्या वेळाने तो तिथेच विसावला, झोपला…
मला पंढरपूरला येणं शक्य नाहीये हे कळल्यावर माऊली स्वतः मला भेटायला आली, माझ्या खांद्यावर बसली, काही क्षण विसावली… राम कृष्ण हरी…”