Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ उत्कृष्ट लेखणीने तारक मेहता यांना दिली वेगळी ओळख, शेवटच्या श्वासापर्यंत घेतला होता मनोरंजनाचा वसा…

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे लेखक आणि स्तंभलेखक, लेखक, नाटककार, पटकथालेखक तारक मेहता यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त खास त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया… 

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 26, 2024 | 07:45 AM
'या' उत्कृष्ट लेखणीने तारक मेहता यांना दिली वेगळी ओळख, शेवटच्या श्वासापर्यंत घेतला होता मनोरंजनाचा वसा...

'या' उत्कृष्ट लेखणीने तारक मेहता यांना दिली वेगळी ओळख, शेवटच्या श्वासापर्यंत घेतला होता मनोरंजनाचा वसा...

Follow Us
Close
Follow Us:

‘सब टिव्ही’वरील सर्वाधिक प्रसिद्ध मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’कडे पाहिलं जातं. ही मालिका गेल्या १५  वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. ही मालिका फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचे लेखक तारक मेहता यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त खास त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

“निळुभाऊंच्या नावाच्या पुरस्कारासारखं दुसरं सुख नाही…” निळू फुलेंच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट

तारक मेहता यांचा जन्म २६ डिसेंबर १९२९ रोजी गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये झाला. ते फक्त पेशाने लेखकच नाही तर, स्तंभलेखक, नाटककार आणि पटकथालेखकही होते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचं कथानक दस्तुर खुद्द तारक मेहता यांनी लिहिलेल्या ‘दुनिया ने उंधा चष्मा’ या कादंबरीतूनच घेण्यात आलेले आहे. मालिकेमुळे लेखक तारक मेहता बरेच प्रकाशझोतात आले होते. २०१५ या वर्षी त्यांना भारत सरकारचा सर्वात मानाचा समजला जाणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. हा पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात आला होता.

“एकोणवीस वर्ष झाली आमचा सांता जाऊन…”, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट

तारक मेहता यांची ओळख प्रेक्षकवर्गात वेगवेगळ्या माध्यमातील लिखाणाची असलेली विविधता आणि गुजराती नाट्य चळवळीसोबत जोडल्या गेलेल्या नाळेने त्यांना एक वेगळीच ओळख दिली. सोबतच त्यांना ‘तारकभाई’ या नावानेही चाहते ओळखायचे. तारक मेहता यांची ओळख प्रेक्षकांमध्ये आणि वाचकांमध्ये एक उत्कृष्ट साहित्यिक अशी अजूनही कायम आहे. ‘दुनियाने उंधा चष्मा’ १९६५, ‘तारक मेहताना आठ एकांकियो’ १९७८, ‘तारक मेहतानो टपुडो’ १९८२, ‘तारक मेहतानी टोकळी परदेसना प्रवासे’१९८५ या लोकप्रिय साहित्यांचा समावेश त्यांच्या उत्कृष्ट लेखणीत करता येईल.

नाताळनिमित्त अभिनेत्री कीर्ती शेट्टीचं खास फोटोशूट

तारक यांनी आपल्या दमदार लेखणीने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सर्व चाहत्यांना हसवण्याचा वसा हाती घेत त्यांनी सर्वांचेच मनोरंजन केले. ‘सोनी सब’वरील तारक मेहता यांच्या नावावरुन सुरु झालेली मालिका चाहत्यांना आजही त्याच जोशात हसवते. तारक यांच्या लेखणीबद्दल सांगायचे तर, त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून ‘वन लाइनर’च्या विनोदाने चाहत्यांना खळखळून हसवले आहे. अनेक विनोदी पुस्तकांचे लेखन तारक मेहता यांनी गुजराती भाषेत केले आहे. गुजराती नाट्य चळवळीतील योगदान कधीच न विसरण्यासारखे आहे.

“रंग माळीयेला…” कौमुदी वालोकरच्या हळदीतले पाहा सुंदर Photos!

मालिकेच्या लिखानासोबतच तारक यांनी आपल्या आयुष्यात तब्बल ८० पुस्तकं लिहीली आहेत. तारक यांनी १९७१ पासून ‘चित्रलेखा’ मासिकेसाठी लेखन सुरु केले होते. त्यापूर्वी तारक मेहता यांच्या खांद्यावर १९६० ते १९८६ या कालखंडात केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म डिव्हिजनमध्ये अधिकारी म्हणून जबाबदारी होती. त्यासोबतच ‘नवूं आकाश नवी धरती’ आणि ‘कोथळामांथी खिलाडी’ हे गुजराती भाषिक पुस्तकाचंही त्यांनी लिखाण केलं होतं. त्याचकाळात त्यांनी लिखाण केलेले पुस्तकं जबरदस्त गाजले.

Web Title: Taarak mehta birth anniversary taarak mehta writing contributed to the success of taarak mehta ka ooltah chashmah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 07:45 AM

Topics:  

  • Taarak Mehata Ka Ooltah Chashmah

संबंधित बातम्या

जेठालाल- बबिता नसताना ‘तारक मेहता का…’ शो TRP मध्ये पहिल्या स्थानावर; भिडे मास्तरांनी सांगितलं सर्व काही
1

जेठालाल- बबिता नसताना ‘तारक मेहता का…’ शो TRP मध्ये पहिल्या स्थानावर; भिडे मास्तरांनी सांगितलं सर्व काही

१७ वर्षांनंतर जेठालाल- बबिताजीची ‘तारक मेहता…’मधून एक्झिट? नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दिसले नाहीत, अय्यरचा प्रवासही संपला…
2

१७ वर्षांनंतर जेठालाल- बबिताजीची ‘तारक मेहता…’मधून एक्झिट? नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दिसले नाहीत, अय्यरचा प्रवासही संपला…

“लग्न करण्यासाठी आईने माझ्यावर…”, ‘तारक मेहता का…’ फेम बबिताचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
3

“लग्न करण्यासाठी आईने माझ्यावर…”, ‘तारक मेहता का…’ फेम बबिताचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

TMKOC: ‘तारक मेहता का…’मधील ‘त्या’ डायलॉगवर घातलेली बंदी; जेठालाल आलेला अडचणीत, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा
4

TMKOC: ‘तारक मेहता का…’मधील ‘त्या’ डायलॉगवर घातलेली बंदी; जेठालाल आलेला अडचणीत, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.