सध्या सर्वत्रच लग्नाची लगबग सुरु आहे. अशातच अनेक सेलिब्रिटीही लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकताना दिसणार आहे. अभिनेत्री कौमुदी वालोकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या तिच्या घरी लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अभिनेत्री कौमुदी वालोकरने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर हळदी दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
Kaumudi Walokar Haldi Photos
'आई कुठे काय करते' फेम आरोही अर्थात कौमुदी वालोकरच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अभिनेत्रीच्या घरी लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. २२ डिसेंबरला "ग्रहमख" विधी, २४ डिसेंबरला "मेहंदी"चा कार्यक्रम होता. आता आज हळदीचा कार्यक्रम आहे.
अभिनेत्री कौमुदी वालोकर बॉयफ्रेंड आकश चौकसेसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. अभिनेत्रीच्या हातावर आपल्या बॉयफ्रेंडच्या नावाची मेहंदी रंगली असून दोघांवरही सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. कौमुदीने इन्स्टाग्रामवर "रंग माळीयेला..."असं कॅप्शन देत लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये कौमुदीने हळदीच्या कार्यक्रमामध्ये पिंक रंगाचा सुंदर वन पीस हळदीसाठी परिधान केला होता. कौमुदीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी खास झेंडूच्या फुलांची सुंदर सजावट केलेली पाहायला मिळाली. कौमुदीच्या हळदीचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंना पसंती दिलीय.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, "आई कुठे काय करते" मालिकेतील कलाकारांनीही उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये मालिकेतील काही कलाकार पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर कौमुदीच्या हळदीचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेत्रीच्या घरी आज हळदीचा कार्यक्रम असून येत्या १ ते २ दिवसांत अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख अद्यापही गुलदस्त्यात असून लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. कौमुदीला तिच्या मित्र-मैत्रीणींनी आणि कुटुंबियांनी हळद लावली असून ती फारच सुंदर दिसत आहे..
कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे. आकाश हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. कौमुदी आकाशसोबत सात फेरे घेत संसार थाटणार आहे. कौमुदी पेशाने सेलिब्रिटी असून अभिनेत्रीचा होणारा नवरा फिल्म इंडस्ट्रीतला नव्हता.