Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JioHotstar वरील TADKA ने गाठला 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा; मायक्रो-कंटेंट मनोरंजनाची लोकप्रियता वाढली

JioHotstar वरील TADKA या मायक्रो-कंटेंट प्लॅटफॉर्मने 100 दशलक्ष (10 कोटी) वापरकर्त्यांचा टप्पा पार करत डिजिटल मनोरंजन क्षेत्रात नवा विक्रम नोंदवला आहे. लॉन्चनंतर प्रत्येक प्रेक्षकाचा दैनंदिन वॉचटाइम पाचपट वाढल्याने या फॉरमॅटला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 11, 2026 | 08:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतातील डिजिटल मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठत JioHotstar वरील TADKA या मायक्रो-कंटेंट प्लॅटफॉर्मने 100 दशलक्ष (10 कोटी) वापरकर्त्यांचा आकडा पार केला आहे. या यशामुळे प्रीमियम मायक्रो-कंटेंट हा स्वतंत्र आणि मुख्य प्रवाहातील मनोरंजनाचा प्रकार म्हणून उदयास आल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाइल-फर्स्ट प्रेक्षकांमध्ये लघु स्वरूपातील कंटेंटची वाढती लोकप्रियता आणि बदलत्या मनोरंजन सवयींचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे.

Aamchya Ladkya Naik Bai : ‘अभी तो शूटिंग सुरु हुई है’ झाला हो श्रीगणेशा! ऐश्वर्या नारकरची नवी मालिका, मुहूर्त पडला पार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, TADKA च्या प्रारंभिक टप्प्यापासून प्रत्येक प्रेक्षकाच्या दैनंदिन वॉचटाइममध्ये पाचपट वाढ झाली आहे. यावरून या फॉरमॅटला प्रेक्षकांकडून सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. विविध वयोगटांतील तसेच देशभरातील प्रेक्षकांनी या प्लॅटफॉर्मचा स्वीकार केल्याने मायक्रो-कंटेंटच्या वाढत्या प्रभावाची नोंद घेण्यात येत आहे.

TADKA च्या प्रेक्षकवर्गात तरुणांचा मोठा वाटा आहे. एकूण प्रेक्षकांपैकी 42 टक्क्यांहून अधिक प्रेक्षकांचे वय 24 वर्षांखालील आहे. तसेच महानगरांमधील आणि टियर-2 शहरांमधील प्रेक्षक प्रत्येकी सुमारे 40 टक्के वॉचटाइममध्ये योगदान देत आहेत. यामुळे प्रीमियम, मोबाइल-केंद्रित आणि जलद मनोरंजनाच्या स्वरूपाला देशभरातून पसंती मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मायक्रो-कंटेंटची वाढती मागणी कंटेंट निर्मितीच्या पद्धतीतही बदल घडवून आणत आहे. पारंपरिक मनोरंजन केंद्रांपलीकडे जाऊन आता मुंबई, दिल्ली, लखनौ, इंदूर, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशांतील कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण क्रिएटिव्ह इकोसिस्टम तयार होत आहे.

JioHotstar प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आलेल्या TADKA मध्ये 100 हून अधिक मूळ (ओरिजिनल) शीर्षकांचा समावेश आहे. 30 ते 60 सेकंदांच्या उभ्या (व्हर्टिकल) आणि भागांमध्ये विभागलेल्या कथा मोबाइल वापरकर्त्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. दैनंदिन भावना, नातेसंबंध, महत्त्वाकांक्षा आणि आधुनिक भारतीय जीवनशैली यांवर आधारित कथानकांमुळे या कंटेंटला मोठी पसंती मिळत आहे. रोमांस, ड्रामा, थ्रिलर, कॉमेडी, क्रीडा आणि युवा-केंद्रित कथा अशा विविध प्रकारांचा समावेश या प्लॅटफॉर्मवर करण्यात आला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये हा कंटेंट उपलब्ध आहे.

Krushnai chya Leki : आता होणार कहर…! ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; साकारणार ‘हे’ महत्वाचं पात्र

या यशाबाबत प्रतिक्रिया देताना JioStar चे मायक्रो-कंटेंट विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष अंबुज कश्यप यांनी सांगितले की, “100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा हा केवळ TADKA साठीच नव्हे, तर संपूर्ण स्ट्रीमिंग उद्योगासाठी महत्त्वाचा क्षण आहे. प्रेक्षकांच्या पाहण्याच्या सवयी बदलत असून, दिवसातील विविध क्षणांमध्ये सहज बसणाऱ्या कथाकथनासाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. मायक्रो-कंटेंट हा आता एक स्वतंत्र आणि प्रभावी मनोरंजन प्रकार बनत आहे.”

JioHotstar च्या व्यापक मनोरंजन धोरणाचा TADKA हा एक महत्त्वाचा भाग आहे. बदलत्या ग्राहक सवयींनुसार प्लॅटफॉर्म सातत्याने नवनवीन अनुभव विकसित करत आहे. इंटरअॅक्टिव्ह कॉमर्स, सेकंड-स्क्रीन अनुभव आणि मायक्रो-कंटेंटसारख्या नवकल्पनांद्वारे प्रेक्षक आणि कथांमधील नाते अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सध्या 500 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आणि 3 लाख तासांहून अधिक कंटेंट लायब्ररीसह JioHotstar हे जगातील सर्वात मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक मानले जाते. TADKA च्या यशामुळे भारतातील डिजिटल मनोरंजनाच्या नव्या पर्वाला अधिक गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Tadka on jiohotstar hits the 100 million user milestone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • JioHotstar
  • latest movies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.