फोटो सौजन्य - Social Media
मालिकेचा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मालिकेच्या शूटिंगची सुरुवात झाली आहे. 11 जून रोजी ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिकेचा मुहूर्त पार पडला आहे. मालिका स्टार प्रवाह वाहिनेवर प्रसारित होणार असून मालिका ओशन फिल्म कंपनीद्वारे प्रस्तुत आहे. Ocean Film Compony ने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर मालिकेच्या मुहूर्ताचे क्षण शेअर केले आहेत. त्याखाली कॅप्शन देत नमूद केले आहे की “येत आहे तुमच्या भेटीला… नवी मालिका ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ लवकरच… Star प्रवाहवर…”
अनेक मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा!
मुहूर्ताचे क्षण पाहून अनेक सुप्रसिद्ध मराठी मालिका कलाकारांनी या मालिकेसाठी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मालिका क्षेत्रात झळकणारे अनेक कलाकार आणि ऐश्वर्या तसेच अमृताच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच लवकरात लवकर मालिका प्रसारित होण्याची इच्छा सगळ्यांनी सांगितली आहे.
काय असणार मालिका?
मुळात, ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत एका सामान्य शिक्षिकेची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या शिक्षिकेचे पात्र ऐश्वर्या नारकर साकारत आहे. तिच्या कुटुंबाची आणि खासकरून तिच्या लेकींची हळवी गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे.






