Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘120 बहादूर’ चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद, दिग्दर्शक रजनीश घई झाले भावुक म्हणाले, “एडिटिंग दरम्यान..”

‘120 बहादूर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या चित्रपटात भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा उलगडली जाणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Oct 17, 2025 | 08:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजचा आगामी वॉर ड्रामा चित्रपट ‘120 बहादूर’ हा वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. हा टीझर, जो गायिका लता मंगेशकर यांची जयंती लक्षात घेऊन प्रदर्शित करण्यात आला होता, त्याला संपूर्ण देशातून प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा उलगडली जाणार असून, दिग्दर्शकांसाठी हे कथानक चित्रपट रूपात सादर करणं हे एक भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रवास ठरलं आहे. अशा वेळी दिग्दर्शक रजनीश ‘रेझी’ घई यांनी त्या खास क्षणाबाबत उघडपणे सांगितलं आहे, ज्याने त्यांना खोलवर स्पर्श केला.

जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की चित्रीकरणादरम्यान असे कोणते प्रसंग होते का, ज्यांनी त्यांना किंवा क्रूला भावनिकदृष्ट्या ढवळून टाकलं, त्यावर उत्तर देताना रजनीश घई म्हणाले,”जर तुम्ही या लढाईबद्दल जाणत असाल, तर 120 पैकी बहुतांश सैनिक या युद्धात शहीद झाले. त्यामुळे आम्ही अनेक दृश्ये अशी चित्रीत केली आहेत, जिथे एकामागोमाग एक सैनिक आपल्या सोबतचं माणूस गमावत जातो. आणि ही दृश्यं इतक्या भावुकपणे समोर आली की, जेव्हा मी एडिटिंग करत होतो, तेव्हा एक-दोनदा माझ्या डोळ्यांतही पाणी आलं. मला वाटतं की या चित्रपटाचा भावनिक भाग खूप खोलवर भिडतो.”

ते पुढे म्हणाले, “ही दृश्यं चित्रीत करणं खूप कठीण होतं, आणि जेव्हा तुम्ही स्वतः ती भावना अनुभवत असता आणि दृश्यं खरंच चांगली उतरतात, तेव्हा ती तुम्हाला अंतर्मनापर्यंत भिडतात. म्हणूनच मी म्हणेन की मला या चित्रपटाच्या भावनिक भागाचा खूप अभिमान वाटतो. हा भावनिक प्रवाह पूर्ण चित्रपटभर आहे, पण आम्ही त्या क्षणांना योग्य प्रकारे पकडले, असं मला वाटतं. जवानांमधली मैत्रीही अतिशय सुंदरतेने उलगडली गेली आहे.”

Hombale Filmsचा ‘कांतारा’ हिट, ऋषभ शेट्टींचं वाराणसीतून आभार प्रदर्शन

‘120 बहादूर’ हा चित्रपट 13 कुमाऊँ रेजिमेंटच्या 120 भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्याची कहाणी आहे, ज्यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धात रेजांग ला येथे ऐतिहासिक लढाई लढली होती. या चित्रपटात फरहान अख्तर यांनी मेजर शैतान सिंह भाटी, पीव्हीसी यांची भूमिका साकारली आहे, जे आपल्या सैनिकांसह भारतीय लष्करी इतिहासातील सर्वात निर्णायक युद्धांपैकी एका लढाईत शेवटपर्यंत लढले. या चित्रपटाच्या मध्यवर्ती भावना एका ओळीत व्यक्त होते, “आम्ही मागे हटणार नाही!”

‘ठरलं तर मग’ मालिकेत नवीन पूर्णा आजीची एन्ट्री, ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मोठा बदल

चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीश ‘रेझी’ घई यांनी केलं आहे, तर निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) आणि अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओज) यांनी संयुक्तपणे केली आहे.’120 बहादूर’ हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Teaser of 120 bahadur receives overwhelming response from audience director rajnish ghai turns emotional

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 08:08 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • hindi film industry
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Hombale Filmsचा ‘कांतारा’ हिट, ऋषभ शेट्टींचं वाराणसीतून आभार प्रदर्शन
1

Hombale Filmsचा ‘कांतारा’ हिट, ऋषभ शेट्टींचं वाराणसीतून आभार प्रदर्शन

स्त्री सशक्ततेचा स्त्री टॉक्स चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित; तृप्ती देसाई दिसणार प्रमुख भूमिकेत
2

स्त्री सशक्ततेचा स्त्री टॉक्स चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित; तृप्ती देसाई दिसणार प्रमुख भूमिकेत

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि डॉ.नेनेंच्या लग्नाला २६ वर्ष पूर्ण,फोटो शेअर करत म्हणाली,….
3

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि डॉ.नेनेंच्या लग्नाला २६ वर्ष पूर्ण,फोटो शेअर करत म्हणाली,….

‘कच्चा बादाम’ गायकाला प्रसिद्धी मिळाली, पण गाण्याचे गेले हक्क; नेमकं काय प्रकरण?
4

‘कच्चा बादाम’ गायकाला प्रसिद्धी मिळाली, पण गाण्याचे गेले हक्क; नेमकं काय प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.