Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी इंडस्ट्रीत पहिल्यांदाच घडतंय, ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’चित्रपटाचा थिएटमरमध्ये नाही तर ‘इथे’ होणार प्रीमियर; वाचा केव्हा आणि कधी

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे आणि हा मान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला मिळाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 17, 2024 | 01:27 PM
मराठी इंडस्ट्रीत पहिल्यांदाच घडतंय, ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’चित्रपटाचा थिएटमरमध्ये नाही तर 'इथे' होणार प्रीमियर; वाचा केव्हा आणि कधी

मराठी इंडस्ट्रीत पहिल्यांदाच घडतंय, ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’चित्रपटाचा थिएटमरमध्ये नाही तर 'इथे' होणार प्रीमियर; वाचा केव्हा आणि कधी

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे आणि हा मान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. चित्रपटातील कलाकार सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या उपस्थितीत हा खास कार्यक्रम होणार असून या ऐतिहासिक प्रीमियरसाठी विनामूल्य प्रवेश असून नाट्यगृहातच तिकीट उपलब्ध होणार आहेत.

‘शिवा’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावुक पोस्ट शेअर करत दिली माहिती

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट लग्नसंस्थेवर आधारित असून, आधुनिक विचारसरणी यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अथश्री आणि गायत्री ही दोन परस्परविरोधी स्वभावाची पात्रे एकमेकांना पहिल्यांदा भेटतात आणि त्यांच्या पहिल्या भेटीतून काही मजेदार काही भावनिक घटना घडतात. त्यांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून काही रहस्ये देखील समोर येतात, ज्यामुळे कथा अधिक मनोरंजक बनते.

चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये नेहमीच मर्यादित स्क्रीन मिळतात, त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शित करणं हा एक आव्हानात्मक निर्णय आहे आणि हे आव्हान आम्ही पेललं आहे. या पद्धतीने आम्ही अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू आणि त्यांना एक नवा अनुभव देऊ शकू. नाट्यगृहातील या भव्य प्रीमियरसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”

 

चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणतात “हा चित्रपट प्रायोगिक तत्वावर असून पूर्वनियोजित नाटकांच्या खेळांना कोणत्याही प्रकारचा धक्का न लागू देता नाट्यगृहामध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. तसेच यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपट व नाटक या दोन्हीचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येईल.”

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटात प्रथमच प्रेक्षकांना सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. या प्रमुख कलाकारांसोबत प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शुभम फिल्म प्रॅाडक्शन निर्मित, आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचं ‘इलू इलू’ चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण, प्रेमाची भावना हळूवार उलगडायला येणार

Web Title: Tejashri pradhan and subodh bhave starrer hashtag tadev lagnam marathi movie released pune in natyagruh marathi film industry in first time experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 01:27 PM

Topics:  

  • marathi film
  • subodh bhave

संबंधित बातम्या

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
1

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
2

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
3

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

बायोपिक्सचा सम्राट सुबोध भावे आता ‘नीम करोली बाबा’ यांच्या भूमिकेत!
4

बायोपिक्सचा सम्राट सुबोध भावे आता ‘नीम करोली बाबा’ यांच्या भूमिकेत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.