मुंबई: ‘बिग बॉस 15’ विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) लवकरच ‘नागिन 6’ (Naagin 6) मध्ये दिसणार आहे. 12 फेब्रुवारी 2022 पासून हा शो सुरू होणार आहे. या शोमध्ये तेजस्वी प्रकाश व्यतिरिक्त बिग बॉसचे माजी स्पर्धक सिंबा नागपाल आणि मेहक चहल देखील दिसणार आहेत.
तेजस्वीने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत तेजस्वीने लिहिले आहे,”तुम्ही माझ्या सर्वच पात्रांवर प्रेम केले आहे. तसेच प्रेम माझ्या आगामी पात्रावरदेखील करा. ‘नागिन’मध्ये मी ‘प्रथा’ हे पात्र साकारणार आहे”.
‘नागिन 6’ ची कथा विषाणूपासून संरक्षण करणे, अशी आहे. व्हायरसपासून देशाला वाचवण्याचे काम नागिन हाती घेणार आहे. आतापर्यंत नागिन तिच्या प्रेमासाठी आणि कुटुंबासाठी लढली आहे. पण या भागात नागिन देशासाठी लढताना दिसणार आहे.