ब्रेकअपच्या चर्चा, मध्येच पॅचअप अन् खास फोटोशूट; तेजस्वी प्रकाश- करण कुंद्राच्या नात्यातला अनोखा ट्वीस्ट
टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘स्वरागिनी’ आणि ‘नागिन ६’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्रीने आपल्या लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. छोट्या पडद्यावर कायम देसी लुक मध्ये प्रेक्षकांसमोर आलेली तेजस्वी खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे. अनेकदा तेजस्वी सोशल मीडियावर तिचे फोटोही शेअर करते, ज्यांना तिचे चाहते खूप लाईक्स देतात. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या तेजस्वी प्रकाशच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया…
दिवंगत अभिनेते शरद तळवलकर यांच्या नातवाची हॉलिवूडमध्ये वर्णी, झळकला ‘या’ प्रसिद्ध वेबसीरिजमध्ये…
अभिनेत्रीसोबतच इंजिनियरिंग क्षेत्रातही आपलं नशीब आजमावणाऱ्या तेजस्वी प्रकाशचा जन्म १० जून १९९३ रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला आहे. ती एका मराठमोळ्या कुटुंबात जन्माला आली आहे. तेजस्वीला खरी ओळख ही बिग बॉसमधून मिळाली. तेजस्वी ही बिग बॉसच्या १५ च्या पर्वाची विजेती आहे. बिग बॉसनंतर तिचे फॅन फॉलोविंग खूपच वाढले आहे. तेजस्वी अजून एका गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असते, ते म्हणजे तिचं रिलेशनशिप. तेजस्वी अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तिच्या करणसोबतच्या पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात. बऱ्याचदा हे दोघे एकत्र स्पॉट होतात.
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय जोडीच्या अनेकदा ब्रेकअपच्या चर्चा झाल्या आहेत. पण त्यानंतर या कपलचं सगळं सुरळीत सुरु असल्याचं दिसलं. अनेक कार्यक्रमांमध्ये या कपलने एकत्र हजेरीही लावली. २०२०- २१ पासून करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एकमेकांना डेट करत आहेत. कपल म्हणून चर्चेत राहिलेल्या ह्या जोडीच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु असूनही त्यावर केव्हाही या दोघांपैकी कुणीही भाष्य केलेलं नाहीये. ब्रेकअपच्या चर्चांमुळे चर्चेत राहिलेल्या ह्या कपलने अनेकदा सोशल मीडियावर रोमँटिक फोटोज् शेअर केलेले आहेत.
एका मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेली तेजस्वी बालपणापासूनच ती संगीतमय वातावरण वाढली आहे. त्यामुळे संगीताशी तिचा जवळचा संबंध आहे. तेजस्वीचे वडिल प्रकाश वायंगणकर हे एक संगीतकार आहेत. अभिनयासोबतच ती गाणही खूप छान गाते. तेजस्वीचं खरं नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर असं आहे. पण तिने जेव्हापासून आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली तेव्हापासूनच तेजस्वी प्रकाश असाच नावाचा वापर केला आहे. तेजस्वीने मालिका विश्वातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ती ‘२६१२’ या मालिकेतून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.
परदेशात देशी लूकमध्ये चमकला परिणीती चोप्राचा पती, कपलच्या क्युट फोटोने वेधले लक्ष
त्यानंतर प्रकाशने ‘संस्कार-धरोहर अपनो की’, ‘स्वरांगिनी’, ‘कर्ण संगिनी’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेजस्वी ‘बिग बॉस १५’मध्ये सहभागी झाली होती आणि ती या पर्वाची विजेती देखील ठरली. बिग बॉसमधून ती नेहमीच तिच्या आणि करणच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत त्यानंतर तेजस्वी एकता कपूरच्या सर्वात मोठ्या मालिकेचा भाग झाली. ‘नागिन’ या मालिकेमुळे तिला आणखी प्रसिद्ध मिळाली. तेजस्वीने रोहित शेट्टी निर्मित’स्कूल कॉलेज आणि लाईफ’ या चित्रपटातून मराठी चित्रपटात पदार्पण केले.