Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अथांग’ वेबसीरिजद्वारे तेजस्विनी पंडितचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, राज ठाकरेंच्या उपस्थितीत ट्रेलर झाला लाँच

जयंत पवार दिग्दर्शित (Jayant Pawar) ‘अथांग’ या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच (Athang Webseries Trailer Launch) सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला सर्व कलाकारांनी पारंपरिक पेहरावातून १८००चा काळ पुन्हा एकदा उभा केला. हा दिमाखदार सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

  • By साधना
Updated On: Nov 22, 2022 | 01:47 PM
athang trailer launch event

athang trailer launch event

Follow Us
Close
Follow Us:

मी राजकारणात अपघातानेच आलो. माझा खरा कल कला क्षेत्राकडेच होता. मुळात मी चित्रपटप्रेमी आहे. त्यामुळे मी वेबसीरिज फार कमीच बघतो. परंतु ‘अथांग’ मी नक्कीच बघणार. जुना काळ पडद्यावर दाखवणे, तसे आव्हानात्मक आहे. मात्र हे आव्हान तुम्ही स्वीकारलं आहे आणि उत्तम कलाकृती सादर केली आहे.’ अथांग या वेबसीरिजच्या ट्रेलर लाँच (Athang Web Series Trailer Launch) सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जयंत पवार दिग्दर्शित (Jayant Pawar) ‘अथांग’ या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला सर्व कलाकारांनी पारंपरिक पेहरावातून १८००चा काळ पुन्हा एकदा उभा केला. हा दिमाखदार सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच या सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ, दिग्दर्शक अभिजीत पानसे, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, श्रेया बुगडे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी निर्माती तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांच्यासोबत गप्पांची मैफलही रंगवली. यानिमित्ताने राज ठाकरे यांचे कलाप्रेमही उपस्थितींना जाणून घेता आले.

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, “या वेबसीरिजच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. कलाकार ते निर्माती हा प्रवास खूपच रंजक होता. कलाकार म्हणून वावरताना फारशी जबाबदारी नसते परंतु निर्माती म्हणून काम करताना कागदावर श्रीगणेशा लिहिण्यापासून ते अगदी आपले काम प्रदर्शित होईपर्यंत किंबहुना त्यानंतरही जबाबदारी असते. मी अक्षय बर्दापूरकर यांची आभारी आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. निर्माती होणे माझ्यासाठी स्वप्न होते आणि ते आज ‘अथांग’च्या निमित्ताने पूर्ण होतेय.’’

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “आज प्लॅनेट मराठीच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट आशय देण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. ‘अथांग’ ही वेबसीरिज त्यापैकीच एक आहे.’’

[read_also content=”शंकर महादेवन यांच्या आवाजाने बहरलेल्या ‘बहर आला’ गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मने https://www.navarashtra.com/gallery/bahar-ala-song-out-from-goshta-eka-paithanichi-nrsr-347252/”]

ट्रेलरमध्ये निसर्गयरम्य कोकण, तिथला रहस्यमय वाडा आणि त्या वाड्यात दडलेली अनेक गुपितं आणि यात आणखी उत्कंठा वाढवणारा शेवटचा प्रश्न. ट्रेलरच्या शेवटी एक लहान मुलगा, “आई अळवत म्हणजे काय?” असा प्रश्न विचारतो. आता सरदेशमुखांच्या कुटुंबाचा आणि त्या अळवतीचा काय संबंध, हे ‘अथांग’ पाहिल्यावरच उलगडेल. थरार, रहस्याने भरलेली ही सहा भागांची वेबसीरिज येत्या २५ नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित या वेबसीरिजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर हे निर्माते आहेत.

Web Title: Tejaswini pandits athang webseries trailer launch by mns chief raj thackeray nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2022 | 01:44 PM

Topics:  

  • planet marathi
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
2

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
3

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
4

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.