'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीने सांगितल्या आईबद्दलच्या खास गोष्टी; पाहा Video
मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन (Mother’s Day) सेलिब्रेट केला जातो. आजच्या दिवशी सोशल मीडियासह सर्वत्र सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण आईविषयी प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. अनेकांनी आईबद्दल प्रेम व्यक्त करत कविता शेअर केली आहे, तर काहींनी आईबद्दल भलीमोठी पोस्टही लिहिली आहे. आता अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडियावर एक स्पेशल व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने त्याच्या आईबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने आईविषयी शेअर केलेल्या खास व्हिडिओमध्ये ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने सांगितले की, त्याला त्याची आई अमु नावाने लाडाने हाक मारते, अमितला त्याच्या आईच्या हातचा आवडीचा पदार्थ वागं, बटाटे आणि टॉमेटोची भाजी, गाजराचा हलवा आणि चिलाची भाजी आहे. जेव्हा अमितने आपल्या आयुष्यात कमावयला जॉबच्या माध्यमातून पैसे कमवायला लागला, त्यावेळी अभिनेत्याने आईसाठी स्वकमाईतून एक खास साडी घेतली होती. मी तिला एक प्लेन साडी घेतली होती. त्या साडीसाठी मी तिच्यासाठी भुलेश्वरच्या इथून एक पट्टा आणला होता. तो त्या साडीला मी लावला होता. माझ्यासाठी ती साडी फार स्पेशल होती.
त्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याने पुढे सांगितले होते की, “माझ्या आईकडे कायमच सापडणारी गोष्ट म्हणजे, तिला देवाची फार आवड आहे. तिच्या हातात कायम देवाचं एक पुस्तक आणि माळ असते. मी कितीही मोठा झालो तरीही मला तिच्यातल्या काही सवयी खटकणाऱ्या आहेत. मी आईच्या पुढे जर कोणतं विशेषण लावायचं असेल तर, देवीआई हेच विशेषण लावेल. ती कायमच मला ‘तू माझं कधी ऐकतच नाहीस…’असं अनेकदा म्हणत असते. पण असं असलं तरीही मला तिचं ऐकावंच लागतं आणि ते मला ती ऐकायलाच लावते.” व्हिडिओच्या शेवटी अमितने स्टार प्रवाहच्या परिवाराकडून आणि ठरलं तर मगच्या संपूर्ण टीमकडून रसिक प्रेक्षकांना ‘मातृदिना’च्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.