Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संघर्षमय प्रेमाची नादमय कथा; ‘नाद – द हार्ड लव्ह’ चा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

Naad The Hard Love : 'नाद - द हार्ड लव्ह' हा मराठी चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची चुणूक दाखवणाऱ्या टिझरनंतर रिलीज झालेल्या अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलरने खऱ्या अर्थाने लक्ष वेधण्याचे काम केले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 11, 2024 | 07:38 PM
संघर्षमय प्रेमाची नादमय कथा; 'नाद - द हार्ड लव्ह' चा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

संघर्षमय प्रेमाची नादमय कथा; 'नाद - द हार्ड लव्ह' चा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटांची परंपरा खऱ्या अर्थाने जपत रसिकांचे परिपूर्ण मनोरंजन करणारा ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा मराठी चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची चुणूक दाखवणाऱ्या टिझरनंतर रिलीज झालेल्या अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलरने खऱ्या अर्थाने लक्ष वेधण्याचे काम केले आहे. अलिकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीत बनणाऱ्या विविधांगी आणि नावीन्यपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या ट्रेलरवर राज्यभरातून प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटाच्या टॅगलाईनसारखाच ट्रेलरही ‘हार्ड’ असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.

हे देखील वाचा – Doraemon चा आवाज देणाऱ्या अभिनेत्रीचं निधन

निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांनी ‘नाद’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, डॉ. विनायक पवार यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. ‘नाद’ची व्याख्या सांगत टिझर प्रदर्शित झाल्यानंतर अ‍ॅक्शनचा धमाका असलेला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा चित्रपट शीर्षकाप्रमाणेच एक हार्ड लव्हस्टोरी सांगणारा आहे.

प्रसंगानुरूप असलेले दमदार आणि रोमँटिक संवाद ट्रेलरमध्ये आहेत. या जोडीला हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्येही आजवर पाहायला मिळाले नसतील अशी लाल मातीतील अ‍ॅक्शन दृश्ये नजर खिळवून ठेवतात. गाण्यांची झलक ट्रेलरमध्ये आहेच, पण रोमँटिक दृश्येही लक्ष वेधतात. प्रेम म्हणजे नेमकं काय? हे आजवर कोणीही सांगू शकलेले नाही. आजतागायत बऱ्याच दिग्दर्शकांनी प्रेमाचे विविध पैलू रूपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटात हार्ड लव्ह म्हणजेच खरंखुरं प्रेम काय असतं ते पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत कधीही न उलगडलेल्या प्रेमाच्या पैलूंसोबतच प्रेमाच्या गुलाबी रंगांमधीलही विविधांगी छटा यात बघायला मिळतील.

हे देखील वाचा : ‘लापता लेडीज’ आणि ‘ताली’ चित्रपटांना मिळाला प्रतिष्ठित पुरस्कार…

‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत असून, त्याचे आजवर कधीही समोर न आलेले रांगडे रूप यात पाहायला मिळणार आहे. किरणच्या जोडीला सपना माने हि नवोदित अभिनेत्री असल्याने नव्या कोऱ्या जोडीची अनोखी केमिस्ट्रीही लक्षवेधी ठरणार आहे. या दोघांच्या जोडीला यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, टिशा संजय पगारे, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग, ईश्वर सातलिंग बोरामणी आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. गीतकार वैभव देशमुख आणि विनायक पवार यांच्या लेखणीतून अवतरलेली गाणी सुप्रसिद्ध संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत.

Web Title: The action packed trailer released social media in marathi movie naad the hard love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 07:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.