बॉलिवूडमध्ये काम करायचं म्हणजे अभिनेत्रींना सर्वात महत्त्वाचं असतं ते त्यांची फिगर आणि फिटनेस. ती जपण्यासाठी त्या जीवाचं रान करतात. पण अशी एक अभिनेत्री आहे जिने आपल्या भूमिकेसाठी तब्बल ९० किलो वजन केलं होतं आणि त्यांनतर काही महिन्यातच पुढच्या भूमिकेसाठी तिने ३२ किलो वजन कमी देखील केलयं. या अभिनेत्रीचं नाव आहे. भूमी पेडणेकर. भूमीने ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या पहिल्याच चित्रपटांतील भूमिकेचं खूप कौतुक झालं. तिने या भूमिकेसाठी तब्बल ९० किलो इतकं वजन केलं होत. पण त्यानंतर मात्र भूमीनें तितक्याच झपाट्याने वजन कमी करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
याबाबत भूमीला विचारलं असता ती म्हणाली की, यासाठी कोणताही विचित्र उपाय न करता केवळ हेल्दी डाएट प्लॅन करुन हे शक्य झाल होतं. तसंच रोज सकाळी मी एक ग्लास गरम पाणी आणि त्यानंतर डिटॉक्स वॉटर घ्यायचे. डिटॉक्स म्हणजे लिंबू, पुदिना आणि काकडी घतलेले पाणी. पाण्यामुळे आपल्या शरीरातील दूषित पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. आणि शरीर स्वच्छ होत, हे पाणी प्यायल्यानंतर मी नित्यनियमाने व्यायाम करायचे. योगा, जीम, कार्डिओ याचीही जोड दिली. या दरम्यान संतुलित आहारही गरजेचा असतो, त्यामुळे मी उकडलेली अंडी खायचे.