Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संत ज्ञानेश्वर महाराजां’ची महागाथा थ्रीडीमध्ये अवतरणार

  • By Rashmi Dongre
Updated On: Jul 20, 2022 | 02:41 PM
‘संत ज्ञानेश्वर महाराजां’ची महागाथा थ्रीडीमध्ये अवतरणार
Follow Us
Close
Follow Us:

‘ज्ञानदेवे रचिला पाया। उभारीले देवालया।।’ या अभंगानुसार संत ज्ञानेश्वर माऊलींनी संतरूपी इमारतीचा पाया रचला. आईप्रमाणे सर्वांवर मायेची पाखर घालणारे संत ज्ञानेश्वर आज माऊली म्हणून संपूर्ण जगात ओळखले जातात. या माऊलींची गाथा आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साथीनं लवकरच थ्रीडी रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

महाराष्ट्राला थोर संतांची भूमी म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं महान संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रानं संतपरंपरेचा वारसा जपला आहे. वारकरी संप्रदायातील थोर संतांच्या आध्यात्मिक वचनांनी परदेशीय नागरिकांच्या मनावरही गारुड केलं आहे. एकीकडे लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून संतांच्या शिकवणूकीची जपणूक करत आहेत, तर दुसरीकडे याच महान संतांच्या साहित्यचा, त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी नागरिक भारतात येऊन वास्तव्य करत आहेत.

तर या चित्रपटाचे निर्माते अजय ठाकूर यांनी नुकतीच व्ही. पतके फिल्म्सच्या बॅनरखाली आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या निमित्तानं माऊलींचा जीवनप्रवास थ्रीडीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आजवर नेहमीच विविधांगी विषयांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्याकडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवण्यात आली आहे. हा मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा समावेश असलेला एक भव्य चित्रपट असेल. या चित्रपटाची कथा-पटकथा अजय ठाकूर आणि समीर आशा पाटील यांनीच लिहीली आहे.

निर्माते अजय ठाकूर यांनी आजवर ‘तानी’, ‘फुंतरू’, ‘टकाटक’, ‘डार्लिंग’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. समीर आशा पाटील यांनीही ‘चौर्य’, ‘यंटम’, ‘वाघेऱ्या’, ‘डार्लिंग’ अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन केलं आहे. देवाजवळ मागण्याची वेळ आली तेव्हा स्वत:साठी काहीही न मागता उदार अंत:करणानं संपूर्ण विश्वासाठी ‘पसायदान’रूपी विश्वप्रार्थना लिहिणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज अवघ्या विश्वाचे माऊली बनले.

‘आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव। दैवताचे नाव सिद्धेश्वर।।’ या अभंगानुसार माऊलींच्या वास्तव्यानं आळंदीसारखं गाव पवित्र झालं. ‘महाविष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर।।’ या अभंगात माऊलींना महाविष्णूचा अवतार म्हटलं आहे. अशा माऊलींचं जीवनचरीत्र आजवर बऱ्याच निर्माता-दिग्दर्शकांनी आपापल्या परीनं प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला असला तरी या चित्रपटात माऊलींचं काहीसं वेगळं रूप आणि देवासोबतचं अनोखं नातं पहायला मिळणार आहे.

या चित्रपटात टायटल रोलमध्ये कोण दिसणार आणि त्यांच्या जोडीला कोणकोणते कलाकार दिसणार याबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर लवकरच मुहूर्त आणि पुढील कामे वेगात सुरू करण्यात येणार असल्याचे प्रोडक्शन हाऊसच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Web Title: The epic story of sant dnyaneshwar maharaj will be narrated in 3d

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2022 | 02:41 PM

Topics:  

  • Sant Dnyaneshwar Maharaj

संबंधित बातम्या

Ashadhi Wari 2025: वरुणराजाच्या उपस्थितीत माऊलींचा परतीचा प्रवास सुरू; पादुकांना नीरा स्नान संपन्न
1

Ashadhi Wari 2025: वरुणराजाच्या उपस्थितीत माऊलींचा परतीचा प्रवास सुरू; पादुकांना नीरा स्नान संपन्न

Ashadhi Wari 2025 : संतांची बंधूभेट; वारीतील अनमोल क्षणमाऊलींची आणि सोपान यांची बंधूभेट
2

Ashadhi Wari 2025 : संतांची बंधूभेट; वारीतील अनमोल क्षणमाऊलींची आणि सोपान यांची बंधूभेट

Ashadhi Wari : हरि नामाच्या जयघोषाने पुरंदावडे दुमदुमले; माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पार
3

Ashadhi Wari : हरि नामाच्या जयघोषाने पुरंदावडे दुमदुमले; माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पार

माऊलींना निरोप देताना जीव झाला कासावीस! लोणंदकरांचा माऊलींना साश्रू नयनांनी निरोप
4

माऊलींना निरोप देताना जीव झाला कासावीस! लोणंदकरांचा माऊलींना साश्रू नयनांनी निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.