सिद्धू मुसेवालाची हुबेहूब कॉपी आहे त्याचा लहान भाऊ, पहिली झलक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
काही वर्षांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. ही हत्या बिष्णोई गॅंगमार्फत करण्यात आली होती. या हत्येमुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती. तरुणांनी सोशल मीडियावर सिद्धू मुसेवालाचे नाव ट्रेंड केले होते. यावेळी पंजाबमधील कायदाव्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. विरोधकांनी तर हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता.
यानंतर सिद्धू मुसेवालाच्या हत्येमुळे त्याच्या आई वडिलांवर दुःखाचा डोगरच कोसळला होता. एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर दोघेही जण निराश झाले होते. परंतु यानंतर दोघांनी असा एक निर्णय घेतला ज्यामुळे फक्त पंजाबात नाही तर देशभरात त्यांच्या निर्णयाची चर्चा होऊ लागली.
दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या आई वडिलांनी पुन्हा एकदा आई-वडील होणार असल्याचे जाहीर केले. यानंतर काही काळानंतर सिद्धू मुसेवालच्या आईने म्हणजेच चरणकौर यांनी IVF तंत्रज्ञान वापरून एका गोंडस मुलाला जन्म दिला. वयाच्या 58 व्या वर्षी चरणकौर यांनी सिद्धू मुसेवालाच्या धाकट्या भावाला जन्म दिला. बाळाच्या आगमानंतर बलकौर सिंह हे भावूक झाले होते. माझा मुलगा परत आलाय असे म्हणत त्यांनी या गोंडस बाळाचे ‘शुभदीप’ असे नाव ठेवले. माझा मुलगा परत आला आहे. ही देवाची कृपा आहे असे सिद्धू मुसेवालाचे वडील म्हणाले होते.
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी त्यांचा भाऊ शुभदीप सिंग सिद्धूचा नवीन फोटो सोहळा मीडियावर शेअर केला आहे. याच पोस्टमध्ये दोघांनी एक व्हिडिओ देखील जोडला आहे. दिवंगत गायकाचे पालक बलकौर आणि चरण यांनी मे २०२२ मध्ये त्यांचा मुलगा सिद्धूचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षांनी बाळाचे स्वागत केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून त्यांनी सांगितले की शब्दांच्या पलीकडे हा आनंद आहे. काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला आहे.
सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) हा पंजाबी गायक, गीतकार, आणि अभिनेता होता, ज्याने पंजाबी संगीत आणि हिप-हॉप इंडस्ट्रीत आपला मोठा ठसा उमटविला होता. त्याचा जन्म 11 जून 1993 रोजी मंसा जिल्ह्यातील विघा गावात (पंजाब, भारत) झाला. सिद्धू मूसेवाला आपल्या सिंगिंग करिअरची 2017 मध्ये सुरूवात केली होती आणि त्याच्या अद्वितीय संगीत शैलीमुळे लवकरच तो पंजाबमध्ये लोकप्रिय झाला होता.
सिद्धू मूसेवाला, पंजाबी गायक, गीतकार आणि अभिनेता, ज्याला जगभरात त्याच्या संगीतामुळे प्रसिद्धी मिळाली होती, त्याची 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मनसा जिल्ह्यात निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या बरोबर असलेल्या दोन इतर व्यक्तींना देखील या हल्ल्यात जखमी करण्यात आले. सिद्धू मूसेवाला या घटनेनंतर एक मोठा वाद आणि चर्चा निर्माण झाली, आणि त्याच्या हत्येचे कारण आणि परिघ आजही समाजात गाजत आहेत.