
शशांक केतकरने अखेर सोडले मौन, जाहीर केले फ्रॉड निर्मात्याचे नाव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गेल्या कित्येक वर्षापासून मंदार देवस्थळी कारणं देत असून आज, उद्या पैसे देतो हेच सांगत आला आहे असं स्पष्ट शशांक केतकरने सांगितले. ५ जानेवारी रोजी सेटलमेंट करणार असं मंदारने सांगितल्यानंतरही शशांकने पोस्ट केली होती की, आता जर फायनल पैसे मिळाले नाही तर सोशल मीडियावर स्क्रिन शॉटसह नावही जाहीर करेन आणि अखेर शशांकच्या सहनशक्तीचा बांध फुटला असून त्याने सर्व सत्य परिस्थिती चाहत्यांना अगदी पुराव्यासह सांगितली आहे.
काय म्हणाला शशांक?
शशांकने आपल्या सोशल मीडियावर मंदार देवस्थळीच्या कारनााम्याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे आणि याशिवाय त्याने संपूर्ण व्हिडिओदेखील शूट करून पोस्ट केलाय. नक्की या पोस्टमध्ये शशांकने काय म्हटलंय, जाणून घेऊयाः
नमस्कार,
मी legal action घेतोच आहे पण तूर्तास मंदार देवस्थळी ( मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा pattern तुमच्याही लक्षात यावा या साठी हा video screenshots सकट पोस्ट करतो आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गया वया करतो, darling, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो.
५,००,००० ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालीकेचे per day प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले ( मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्यानी payment देताना TDS कापला आणि goverment ला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे.
बरं ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही…. सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे, पण आत्ता मी फक्त माझ्या साठी बोलतो आहे.
YouTube वर ४ वर्षपूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला त्यातही त्याचा हा थापा मारायचा pattern clear दिसतो. आणि आमच्या पैसाच केलं काय या बद्दल चकार शब्द काढत नाही तो !
Video Link –
https://youtu.be/SmtKhvgui6M?si=FS-70FZqwOF-4u73
असो, या पुढचा video बाकी सगळ्या legal details सकट असेल 🤗🙂 लवकरच…
याच्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामाला मी किंवा team मधला कोणीही जबाबदार नसेल.
इथे हे आवर्जून सांगाव लागेल सगळेच निर्माते असे fraud अजिबात नसतात. त्यामुळे हे फक्त आणि फक्त @mandarr_devsthali याच्या बद्दल आहे. Industry मध्ये अनेक उत्तम निर्माते आहेत त्यांना नक्की कळेल मी काय म्हणतोय ते. आम्ही उत्तम काम करून तुमच project चालवतो, तुम्ही वेळेत पैसे देऊन तुमचं काम उत्तम करा!
आस्तादनेही दिली होती साथ
शशांकच्या या पुढाकाराला अभिनेता आस्ताद काळेनेही साथ दिली होती. त्यानेही यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत कलाकारांची व्यथा मांडली होती. दरम्यान अनेकांना मंदार देवस्थळीच्या नावाचा अंदाज होता हे नाकारून चालणार नाही. यावर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्सही केलेल्या दिसून येत आहेत.
“पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड