फोटो सौजन्य - JioHotstar Reality
23 ऑगस्ट रोजी बिग बॉस 19 सीझनचा शुभारंभ झाला आहे. या सीजनमध्ये 16 स्पर्धकांनी घरामध्ये एन्ट्री केली आहेत तर शहबाज बदेशा याला स्टेजवरूनच एलिमिनेट करण्यात आले आहे. अनेक टेलीव्हिडनचे कलाकार त्याचबरोबर इंटरनॅशनल कलाकार देखील यावर्षी या बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये सहभागी झाले आहेत. आता बिग बॉसने एक नवा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धक हे पहिल्याच दिवशी एकमेकांशी वाद घालताना पाहायला मिळाले. घरामध्ये एन्ट्री करून 24 तास ही पूर्ण झाले नसताना आता घरात वादाची ठिणगी पेटली आहे.
बिग बॉसच्या घरामध्ये सर्व सदस्याने प्रवेश केल्यानंतर बिग बॉस ने त्यांना पहिला निर्णय घेण्यासाठी स्पर्धक किती सक्षम आहेत हे पाहण्यासाठी त्यांना एक टास्क दिला. बिग बॉस म्हणाला की सदस्य घरामध्ये 16 आहेत पण बेडरूम मध्ये बेड हे फक्त 15 आहेत. घरातला सदस्य हा एक असा असणार आहे जो बिग बॉसच्या घरात राहण्याचा लायकीचा नाही राहणार कारण त्याचं व्यक्तिमत्व हे सर्वात कमी लेव्हलचे वाटले. यावर प्रोमो मध्ये जो तो एकमेकांवर ओरडताना दिसत आहे. आता स्पर्धक कोणाचा नाव पुढे करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
Pehle hi din Bigg Boss ke ghar ka rukh badla, kya hoga gharwaalon ka aapsi sehemati se faisla? 🤔
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @ColorsTV par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/Resg0H83w5
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 24, 2025
वृत्तांच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की मृदुल तिवारी याला सर्वात कमी मनोरंजक स्पर्धक म्हणून बेडरूमच्या बाहेर काढण्यात आले आहे. बिग बॉस १९ च्या प्रीमियरच्या शेवटी, सलमान खानने १५ व्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आणि जनतेचा निर्णय दिला. सलमानने मृदुल तिवारी आणि शाहबाज बदेशा यांना स्टेजवर उभे केले आणि प्रेक्षकांनी शोसाठी कोणाची निवड केली आहे हे सांगितले.
१५ व्या स्पर्धकाची घोषणा हा शोचा शेवटचा क्षण बनला, जेव्हा सलमान खानने सांगितले की मृदुल तिवारी आणि शाहबाज बदेशा यांच्यापैकी कोण घरात प्रवेश करेल आणि कोण बाहेर जाईल. मृदुल तिवारीने मतांद्वारे शाहबाज बदेशा यांना पराभूत केले. स्टेजवरच दोघांमध्ये भांडण झाले, ज्यामुळे शोचे वातावरण थोडे तापले. ‘फॅन्स का फैसला’च्या प्रीमियरमध्ये १५ व्या स्पर्धकाचे स्पर्धक मृदुल तिवारी आणि शाहबाज बदेशा यांच्यात वाद झाला.
प्रीमिअर दिवशीच Bigg Boss 19 चा ‘विजेता’ घोषित? सलमान खानचा मोठा ट्विस्ट, नक्की घडणार काय?
सलमान खानने दोघांनाही विचारले की ते घाबरले आहेत का. यावर मृदुल म्हणाला की ते अजिबात घाबरलेले नाहीत. त्याच वेळी शाहबाज म्हणाला हो मी खूप घाबरलो आहे. हे ऐकून मृदुलने विनोदाने त्याला टोमणे मारले आणि म्हटले की शाहबाजमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. अशा परिस्थितीत शहनाज गिलचा भाऊ शाहबाज गप्प कसा बसणार होता? तो म्हणाला, ‘मला कधीच संधी मिळाली नाही. तू नेहमीच यूट्यूबवर झोपेतून उठून येतोस.’ यानंतर सलमानने आपला निर्णय जाहीर केला आणि सांगितले की, चाहत्यांच्या मतदानाने मृदुल तिवारीने शाहबाज बदेशाला हरवले.