Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Great Indian Kapil Sharma Show चा दुसरा सीझन हसवण्यासाठी सज्ज, धमाकेदार टीझर पाहिलात का ?

लवकरच कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा सुरू होतोय. सर्वांना या शो ची उत्सुकता लागून राहिली असून हा सीझन नक्की कधी सुरू होणार याची विचारणा होत आहे. याचा पहिला टीझर सोशल मीडियावर आला असून आता या शो मध्ये कोणकोणते कलाकार येणार आणि काय धमाल असणार हेदेखील पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 22, 2024 | 12:07 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध शोची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू असते. त्यातीलच एक शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. गेल्या अनेक दिवसांपासून हा शो टिव्हीवर बंद झाला असून लवकरच आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ ओटीटीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या सीझनला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘नेटफ्लिक्स’च्या इन्स्टाग्राम हँडलवर एक धडाकेबाज प्रोमो शेअर करत शोची घोषणा केली आहे.

हे देखील वाचा – शाहरूख खानने मागितलेली प्रसिद्ध दिग्दर्शकांची माफी, नेमकं कारण काय?

गेल्या काही दिवसांपूर्वीच शोच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. फार कमी कालावधीतच शोने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यामुळे चाहते नाराज झाले होते. आता पुन्हा एकदा कपिल शर्मा आणि त्याची टीम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत होते. काही तासांपूर्वीच ‘नेटफ्लिक्स’ने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो शेअर करताना कॅप्शन दिले की, “आता शनिवार होणार ‘फनिवार’ कपिल शर्मा आणि त्याची टीम खास यावेळी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, मनोरंजनाचा डबल धमाका… लवकरच कपिल शर्माचा दुसरा सीझन टेलिकास्ट होईल” असं कॅप्शन देत प्रोमो शेअर केलेला आहे.

 

अर्चना पूरण सिंह, कपिल शर्मा, सुनिल ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, राजीव ठाकूर अशी सर्व स्टारकास्ट तुम्हाला शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दिसेल. लवकरच तुमच्या भेटीला डबल मनोरंजनाचा धमाका घेऊन येत आहोत. असं हे कलाकार म्हणताना दिसत आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या सीझनची थीम इंस्ट्रूमेंटल थीम असणार आहे. या थीमला अमन पंत यांनी संगीत दिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दुसऱ्या सीझनच्या शुटिंगला १३ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या सीझनला एयरपोर्टच्या थीम होती. ती थीमही अमन पंत यांनीच तयार केली होती. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा पहिला सीझन १३ एपिसोडनंतर संपला होता.

हे देखील वाचा – “मी जिवंत आहे तोपर्यंत तुला…’; रक्षाबंधनाच्या निमित्ताने निक्कीने सूरजला दिलं खास वचन

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या पहिल्या सीझनमध्ये बॉलिवूड, संगीत आणि क्रिकेटमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता सीझन २ मध्ये कोणते सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसणार हे पाहणे मनोरंजक असेल. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ हा शो १९२ देशांमध्ये टेलिकास्ट होणार आहे.

Web Title: The great indian kapil show season 2 streaming netflix this comedy show announcement video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 07:25 PM

Topics:  

  • Kapil Sharma
  • The Great Indian Kapil Sharma Show

संबंधित बातम्या

Kapil Sharma : कॉमेडियन कमिल शर्माला धमकावणाऱ्याला अटक, 1 कोटींच्या खंडणीची केली होती मागणी
1

Kapil Sharma : कॉमेडियन कमिल शर्माला धमकावणाऱ्याला अटक, 1 कोटींच्या खंडणीची केली होती मागणी

‘बाबुराव’च्या पात्रावरून वाद! फिरोज नाडियाडवालांची नेटफ्लिक्स आणि कपिल शोवर कायदेशीर कारवाई
2

‘बाबुराव’च्या पात्रावरून वाद! फिरोज नाडियाडवालांची नेटफ्लिक्स आणि कपिल शोवर कायदेशीर कारवाई

”कपिल शर्माच्या शोसाठी निर्माते द्यायचे प्रेक्षकांना पैसे”, टीव्ही अभिनेता विकल्प मेहताचा धक्कादायक खुलासा
3

”कपिल शर्माच्या शोसाठी निर्माते द्यायचे प्रेक्षकांना पैसे”, टीव्ही अभिनेता विकल्प मेहताचा धक्कादायक खुलासा

‘लाज वाटली पाहिजे, १५-१७ वर्ष मुंबईत राहता…’ मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय प्रकरण?
4

‘लाज वाटली पाहिजे, १५-१७ वर्ष मुंबईत राहता…’ मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.