शाहरूख खानने मागितली माफी
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहतो. त्याच्या अभिनयाची चर्चा फक्त भारतातच नाही तर परदेशातही कायम आहे. त्याचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर परदेशातही कायम आहे. एका सुप्रसिद्ध आरजेने किंग खानबद्दल एक महत्वाचा खुलासा केला आहे. आरजेने मुलाखतीत शाहरूखने प्रसिद्ध दिग्दर्शकाची माफी मागितली होती, नेमकी त्याने का माफी मागितली, जाणून घेऊया…
‘इनसाईड द माईंड विथ ऋषभ’ या पॉडकास्टमध्ये आरजे मॅनने मुलाखतीमध्ये एक किस्सा सांगितला. आरजे मॅन एकदा किंग खानच्या मन्नत बंगल्यावर गेला होता. यावेळी अभिनेत्याने एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची हात जोडून मागी मागितली होती. अभिनेत्याने करियरच्या सुरूवातीच्या दिवसांत एक सर्वात मोठी घोडचूक केली होती. अभिनेत्याने दिग्दर्शकांकडून एक स्क्रिप्ट मागवली होती. पण त्याला त्या स्क्रिप्टमध्ये काही प्रोब्लेम होता. (फोटो सौजन्य – Instagram)
हे देखील वाचा – शेखर कपूर ठरले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक मागणी असलेले दिग्दर्शक
शाहरूखचा मेंटर अजीज मिश्राने सांगितले की, तू ह्या चित्रपटामध्ये काम करू नये. माफी मागण्यासाठी शाहरूखने दिग्दर्शकांना फोन केला होता. त्यावेळी दिग्दर्शकांनी शाहरूखला तू चित्रपटात काम करणार आहेस का ? असं विचारलं. त्या प्रश्नावर शाहरूख म्हणाला, “मी तुम्हाला माफी मागण्यासाठी फोन केला आहे. मी तुमच्या चित्रपटात काम करणार नाही.”
“मन्नतच्या पाठीमागे एक बिल्डिंग आहे. ज्यामध्ये शाहरूखची स्टडी रुम आहे. त्यामध्ये शाहरूखला त्याच्या सिनेकरियरमध्ये आजवर जेवढे पुरस्कार मिळाले आहेत. तितके सर्व पुरस्कार त्या शोकेसमध्ये आहेत.” शाहरूखने आपल्या सिनेकरियरमध्ये अनेक हिट सिनेमे चाहत्यांना दिलेले आहेत. शाहरुख शेवटचा ‘डंकी’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
किंग खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, शाहरूख लवकरच लेक सुहानासोबत ‘किंग’ सिनेमातही दिसणार आहे. शिवाय, अभिषेक बच्चन व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.