रक्षाबंधनाच्या निमित्ताने निक्कीने सूरजला दिलं खास वचन
‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटल्यावर आपसुकच वाद आणि भांडण येतंच. पण सध्या ‘बिग बॉस’च्या घरात आपल्याला सर्वच स्पर्धक हसताना आणि खेळताना दिसत आहे. कारण ठरलंय, भाऊ आणि बहिणीचा खास सण म्हणजेच रक्षाबंधनाचा सण. रक्षाबंधनाचा सण बिग बॉसच्या घरात सर्वच स्पर्धक सेलिब्रेट करताना दिसत आहे. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये, निक्की सूरजला राखी बांधताना दिसत आहे. निक्कीच्या आधी सूरजला जान्हवीने आणि ‘अबीर गुलाल’ मालिकेतील श्रीने राखी बांधली होती.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात जोरदार रक्षाबंधन सेलिब्रशन होत आहे. घरातील सदस्य एकमेकांना राखी बांधताना दिसत आहेत. छोटा पुढारीने निक्कीला आपल्या बहिणीचा दर्जा दिला होता. आता ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या एपिसोडमध्ये निक्की सूरजला राखी बांधताना दिसणार आहे. सूरजला राखी बांधताना निक्की म्हणते, “बिग बॉस मराठी’च्या घरात जेवढे दिवस आपण एकत्र आहोत त्याच्यासह बाहेरच्या जगातदेखील मी तुझं रक्षण करेल.”
त्यावर सूरज म्हणतो,”मी तुझी बाहेरच्या जगात रक्षा करेल.” निक्की पुढे म्हणते,”मी जिवंत असेपर्यंत तुला काही कमी जाणवणार नाही. तुला कधीही माझी आठवण आली तर फक्त एक कॉल कर. तुझ्यासाठी मी कायम हजर असेल..नेहमी आनंदी राहा…” त्यानंतर अंकिता डीपी दादाला राखी बांधते. तर दुसरीकडे इरिनाला आपल्या भावाची आठवण येते आणि तिचे डोळे पाणावतात. अरबाजकडे इरिना आपल्या मनातील भावना व्यक्त करते.
हे देखील वाचा – शाहरूख खानने मागितलेली प्रसिद्ध दिग्दर्शकांची माफी, नेमकं कारण काय?
अंकितावर जळतोय डीपी दादा
अंकिताने ‘जळतात मेले’ लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं आहे. त्यामुळे कॅमेऱ्याकडे पाहून डीपी दादा म्हणतो,”मी कोल्हापूरातून आलोय. लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करायला मी इथे आलोय. पण माझ्याकडे काम काय कोण रडलं तर त्यांना हसवा. त्यानंतर ‘बिग बॉस’ अंकिताला विचारतात,”अंकिता तुमच्या टी-शर्टवर काय लिहिलंय?”. त्यावर अंकिता म्हणते,”जळतात मेले”. बिग बॉस म्हणतात,”धनंजय यांचं तेच होतंय”.
शिवाय आजच्या एपिसोडमध्येही प्रेक्षकांना टीम A मधील निक्की आणि इरिनामध्ये मतभेद झालेले पाहायला मिळणार आहेत. प्रोमोमध्ये इरिना रूडाकोवा म्हणते की,”मी तुझ्यामागे काहीही बोलले नाही.” यावर निक्की तांबोळी म्हणते, “मी तुझ्यापद्धतीने घरात का वागू ?” त्यावर इरिना म्हणते,”तुला काय करायचं ते कर.” इरिनाला उत्तर देत निक्की म्हणते, “सगळ्यांना विकून खाणारी आहेस तू… हिला तिच्या देशात रिजेक्ट केलंय म्हणून आली आपल्या देशात आणि आपल्या शोमध्ये…” निक्की आणि इरिनामध्ये नक्की काय वाद झालाय ? यांचं उत्तर प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्येच मिळणार आहे.