the kerala story
‘द केरळ स्टोरी’ मे 12 दिवसांमध्ये 150 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या बारा दिवसानंतर आता हा चित्रपट युकेमध्ये रिलीज होणार आहे. अनेक देशांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चं स्क्रिनिंग रद्द करण्यात आलं होतं. युके (The Kerala Story Release In UK) अर्थात ब्रिटेनच्या सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला रिलीज सर्टिफिकेट दिलं नव्हतं. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा याआधी 12 मे रोजी ब्रिटेनमध्ये रिलीज होणार होता. मात्र बीबीएफसी (BBFC) सर्टिफिकेट न मिळाल्याने ब्रिटेनमधल्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.मात्र आता युकेमधल्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी आता ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट युकेमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
Congrats all of you ❤️❤️ see you in UK #TheKeralaStory https://t.co/iAQJW7GQNT
— Adah Sharma (@adah_sharma) May 16, 2023
सुदिप्तो सेन यांचं म्हणणं काय?
The Kerala Story चे डायरेक्टर सुदिप्तो सेन यांनी सांगितलं की, त्यांची भारतीय ब्लॉकबस्टर फिल्म यूकेमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, “ग्रेट ब्रिटेनचं अभिनंदन. तुम्ही जिंकलात. दहशतवाद हरला. तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे. ओह… आता ब्रिटिश लोक दहशतवादाच्या विरोधातली एक मोठी क्रांती बघू शकतील. #TheKeralaStory”
सुदीप्तो सेन यांचं हे ट्विट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अदा शर्माने रीट्वीट किया है। तिने लिहिलं आहे की, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. यूकेमध्ये भेटुयात. #TheKeralaStory’
ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने अखेर दिलं सर्टिफिकेट
ब्रिटेनमध्ये ‘द केरळ स्टोरी’ चं डिस्ट्रीब्यूशन 24 SEVEN FLIX4U जवळ आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट न दिल्याने डिस्ट्रीब्यूटरने सगळ्या थिएटर मालकांना चित्रपटाचे शो रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आता हा चित्रपट ब्रिटेनमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.
150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
दरम्यान ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 12 दिवसांमध्ये 150 कोटींची कमाई केल्याने हा चित्रपट आता 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.