चाहते करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनॉन यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. पहिल्यांदाच इंडस्ट्रीतील तीन आघाडीच्या महिला एकत्र आपली जादू दाखवताना दिसणार आहेत. करीना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे. हा चित्रपट 29 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे. एकता कपूर आणि रिया कपूर निर्मित हा चित्रपट आहे.
द क्रू हा एकता कपूर आणि रिया कपूरचा खास प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई आणि अबुधाबीमध्ये झाले आहे. हा चित्रपट आधी 22 मार्चला रिलीज होणार होता. पण आता तो 29 मार्चला पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर शेअर करून निर्मात्यांनी नवीन रिलीज डेटची माहिती दिली आहे.
जाणून घ्या टिझरसंदर्भात
करिनाने द क्रू’चा फनी टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये करीना, क्रिती आणि तब्बू एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये एअरपोर्टवर फिरताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये चोली के पीचे क्या है हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे.
व्हिडिओमध्ये विमानाचा कॅप्टन म्हणतो, स्त्रिया आणि सज्जनांनो, मी तुमचा कॅप्टन बोलत आहे. आजच्या फ्लाइटमध्ये आपले स्वागत आहे. आमचे कर्मचारी तुमची पूर्ण काळजी घेतील. पण तुम्हा सर्वांना विनंती आहे की हृदय बाहेर पडू नये म्हणून ब्लाउज घट्ट बांधा. व्हिडिओ शेअर करताना करीनाने लिहिले – बकल अप करा, तुमचे पॉपकॉर्न तयार करा आणि सर्व्ह करण्यासाठी तयार व्हा. क्रू या मार्चमध्ये रिलीज होत आहे.