फोटो सौजन्य - Social Media
झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. तुमच्या आवडत्या मालिकांमधील एक मालिका प्रेक्षकांचे निरोप घेणार आहे आणि तसेच नवीन मालिका तुमच्या भेटीसाठी येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘कमळी’ या मालिकेला टेलिकास्ट करण्यात आले. येताच मालिकेने मोठा प्रेक्षकवर्गही तयार केला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेची नवीन सिरीज सुरु झाली असून, या मालिकेच्या प्रोमोनेच मोठा फॅनबेस तयार केला होता. ‘चला हवा येऊ द्या भाग २’ ही प्रेक्षकांच्या फार पसंतीस येत आहे. या मालिकेत दोन सुप्रसिद्ध कॉमेडीवीर गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव यांची एंट्री झाली आहे.
नव्या मालिकांच्या एन्ट्रीमुळे हयात असणाऱ्या मालिकांच्या वेळेवर परिणाम होताना दिसणार आहे. मुळात, एक मालिका कायमची बंद करण्यात येणार आहे. त्याजागी ‘तारिणी’ नावाची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार, एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या मालिकेचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. ११ ऑगस्टपासूनही मालिका ‘झी मराठी’वर सोमवार ते शनिवार रात्री साडे ९ वाजता टेलिकास्ट केली जाणार आहे. या मालिकेसाठी शिवानी सोनार तसेच झी मराठीवरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग आतुर झाला आहे.
‘ही’ मालिका घेणार निरोप
गेल्या दोन वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिपत्य गाजवणारी मालिका ‘शिवा’ अखेर बंद होणार आहे. हिरोईन अशी असली पाहिजे? याची व्याख्या तोडणारी आणि एक राऊडी हेरॉईन कशी असू शकते, याचे उत्तम उदाहरण सांगणारी मालिका ‘शिवा’ आता Off Air होत असल्याने चाहतावर्ग भावून तर झालाच आहे. परंतु, झी मराठीच्या प्रेक्षकवर्गाने तिन्ही मालिकांचे जोरदार स्वागत केले आहे. तसेच या मालिकांच्या पुढील प्रवासाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. काही महिन्यांपूर्वी ‘ नवरी मिळे हिटरला’ ही प्रसिद्ध मालिका Off Air गेली होती.