फोटो सौजन्य - instagram
२९ जुलै २०२५ या दिवशी इंडस्ट्रीमध्ये दुःखद बातमी घातली आहे, हॉलिवूड आणि इस्रायली चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते अॅलोन अबाउटबोल यांचे अचानक निधन झाले. अभिनेत्याने वयाच्या ६० वर्षी खर्च श्वास घातला आहे. तेल अवीवमधील हबोनिम बीचवर त्यांचे निधन झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना वाचवता आले नाही. या बातमीने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली, तसेच त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही आहे.
अभिनय जगतातील तेजस्वी तारेने घेतला निरोप
अॅलोन अबाउटबोल यांचा जन्म २८ मे १९६५ रोजी इस्रायलमधील किर्यात अता येथे एका सेफार्डिक ज्यू कुटुंबात झाला. १९८० च्या दशकात सुरू झालेली त्यांची अभिनय कारकीर्द ४२ वर्षे चालली, ज्यामध्ये त्यांनी १०० हून अधिक चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम केले. त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांना केवळ इस्रायलमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेष ओळख मिळाली आहे.
सोने पर सुहागा! घ्या ‘या’ नव्या चित्रपटांची मज्जा ते ही अर्ध्या किमतीत
अॅलोन यांची चित्रपट कारकीर्द
अॅलोन अबाउटबोल यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘टू फिंगर्स फ्रॉम सिडॉन’ या इस्रायली चित्रपटातून केली, ज्यामुळे ते पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना जेरुसलेम चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटानंतर त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. प्रेक्षकांना त्यांचे प्रत्येक काम आवडू लागले. आता त्यांच्या निधनामुळे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
अॅलोनचा पहिला हॉलिवूड चित्रपट
त्यांचा पहिला हॉलिवूड चित्रपट रॅम्बो III (१९८८) होता, ज्यामध्ये त्यांनी निसेमची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘बॉडी ऑफ लाईज’, ‘द डार्क नाईट राईजेस’ आणि ‘लंडन हॅज फॉलन’ सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांना आठवतील. अभिनेता आता आपल्यात नसले तरी त्यांचे काम नेहमीच चाहत्यांच्या मनात जिवंत राहणार आहे.
टीव्हीवरही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या
अॅलोन अबाउटबोल यांनी केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर टेलिव्हिजनवरही आपली छाप सोडली आहे. ‘स्नोफॉल’ मधील एव्ही ड्रेसलरच्या भूमिकेपासून ते ‘होमलँड’, ‘एफबीआय: इंटरनॅशनल’ आणि ‘ट्विन पीक्स’ पर्यंत, त्यांनी अनेकदा तीव्र, रहस्यमय आणि गंभीर भूमिका साकारल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना अनेकदा मोसाद एजंट किंवा गुंड म्हणून पाहिले गेले. अॅलोन अबाउटबोल यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी शिर बिलिया आणि चार मुले दुःख व्यक्त करत आहेत. ते केवळ एक उत्तम अभिनेताच नव्हते तर एक कुटुंबातील मुख्य माणूस देखील होते.
मृत्यूचे कारण उघड झालेले नाही
त्यांच्या मृत्यूच्या कारणाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. काही अहवालांनुसार, तेल अवीवमधील त्या समुद्रकिनाऱ्यावरील जोरदार लाटांमुळे अभिनेत्याचा मृत्यू झाला असावा असे म्हटले जात आहे. परंतु हा अजूनही तपासाचा विषय आहे. पोलीस त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अजूनही शोधत आहेत.