टायटॅनिक (Titanic) चित्रपट हा चित्रपट पाहिला नसेल असा चित्रपट प्रेमी मिळण शक्यचं नाही. महाकाय जहाज आणि लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाने त्या काळी अनेकांना मनावर अधिराज्य गाजवलं. त्या चित्रपटातील एक अतिशय गाजलेली भूमिका साकारलेल्या डेविड वॉर्नर अभिनेत्यानं या जगाचा निरोप घेतला. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
टायटॅनिक चित्रपटात डेविड वॉर्नर यांनी स्पाइसर लवजॉय या दुष्ट नोकरची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती. या शिवाय 70- 80 च्या दशकात ‘लिटिल मॅल्कम’, ‘ट्रॉन’, ‘टाइम बँडिट्स’, ‘स्टार ट्रँक’ आणि ‘द फ्रेंच लिटिल वुमन’ या आणि अशा अनेक चित्रपटांचा अनेक दमदार भूमिका साकारल्या होत्या.
[read_also content=”कारगिल विजय दिवस देशभरात साजरा; शूर सुपुत्रांच्या शौर्याचे स्मरण https://www.navarashtra.com/india/kargil-victory-day-celebrated-across-the-country-and-remembering-the-bravery-of-brave-sons-nrgm-308101.html”]
डेव्हिड वॉर्नर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डेव्हिड यांचं रविवारी 24 जुलै रोजी लंडनमध्ये कर्करोगामुळे निधन झालं अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. डेव्हिड वॉर्नर यांनी दोन लग्न केले होते. आता त्यांच्या पश्चात पत्नी लिसा, मुलगा ल्यूक आणि सून, पहिली पत्नी हॅरिएट इव्हान्स असा परिवार आहे. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच चाहते आणि कला जगतातील अनेकांनीच त्यांना श्रद्धांजली वाहिली.
[read_also content=”‘आता यांना शिवसेना प्रमुख व्हायचंय, याला हावरटपणा म्हणतात’ उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/udhhav-thackeray-crirized-on-eknath-hsinde-now-he-wants-to-be-shivsena-head-this-is-called-stubbornness-nrps-308132.html”]