भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं त्याची ब्रँड ॲम्बेसिडर बनली कॅटरिना कैफ…
काही महिन्यांपूर्वी मालदीवच्या ३ मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नकारात्मक टिप्पणी केल्यानंतर भारत- मालदीव संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली. सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार आणि ‘लक्षद्वीप चलो’ असे नारे लावले जाऊ लागले. पण याच दरम्यान, एक नवीन बातमी समोर आली आहे. मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (MMPRC/Visit Maldives) ने ‘सनी साइड ऑफ लाईफ’साठी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची नवीन जागतिक ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे.
Visit Maldives च्या स्पेशल समर सेल कॅम्पियनच्या अंतर्गत ही भागिदारी करण्यात आली आहे. याद्वारे मालदीव जगभरातील पर्यटकांना मालदीवकडे आकर्षित करू इच्छित आहे. विशेष म्हणजे, मालदीव सरकारचा हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालदीव दौऱ्याआधीच ही घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने आजवर तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. याशिवाय तिच्या नृत्याचेही अनेक चाहते आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो- व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
आपल्या अभिनय, डान्स आणि सौंदर्याने चर्चेत राहणारी कतरिना नुकतीच मालदिवची ‘ग्लोबल ब्रँड ॲम्बेसिडर’ झाली आहे. मालदिवने पर्यटनाचे आकर्षण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कतरिना कैफला नवीन ‘ग्लोबल ब्रँड ॲम्बेसिडर’ हे पद दिलं आहे. कतरिना मालदिवची ‘ब्रँड ॲम्बेसिडर’ असणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया एमएमपीआरसीने दिली आहे. कतरिना कैफ ही केवळ एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्रीच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त उद्योजिका देखील आहे. तिला फोर्ब्सचा ‘आयकॉन ऑफ एक्सलन्स’ पुरस्कारही मिळाला आहे. चित्रपट, फॅशन आणि व्यवसाय जगतात ती एक प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक आहे.
ईशा देओलने मुलीच्या वाढदिवशी केला प्रेमाचा वर्षाव, कपाळावर किस घेत शेअर केला क्युट फोटो!
जागतिक ब्रँड ॲम्बेसिडर बनल्यानंतर कतरिना म्हणाली, “मालदीव हे नैसर्गिक सौंदर्याचे प्रतिनिधित्व करते. हे एक असे ठिकाण आहे जिथे सुंदरतेसह शांतता मिळते. सनी साईड ऑफ लाईफचा चेहरा म्हणून माझी निवड झाल्याबद्दल मला अभिमान आहे. जगभरातील लोकांना मालदीव या निसर्गरम्य ठिकाणाचे आकर्षण आणि जागतिक दर्जाच्या ऑफर शोधण्यासाठी मदत करण्यास मी उत्सुक आहे..” कतरिना आणि विकी कौशल अनेकदा मालदीवमध्ये आपला खासगी टाईम एकत्र स्पेंड करताना दिसले आहेत.
‘हेरा फेरी ३’ बनणार की नाही? सुनील शेट्टीने एका वाक्यात सगळंच सांगितलं, म्हणाला…
MMPRC चे CEO आणि MD इब्राहिम शिउरी म्हणाले, “मालदिवची ‘ग्लोबल ब्रँड ॲम्बेसिडर’ म्हणून कतरिनाचे स्वागत करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. तिचे उज्ज्वल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधित प्रतिमा ‘सनी साईड ऑफ लाईफ’ साठी परिपूर्ण आहे. मालदीव सलग पाच वर्षांपासून ‘वर्ल्ड्स लीडिंग डेस्टिनेशन’ आहे आणि या विशेष उन्हाळी मोहिमेसाठी कतरिनाचे आमच्यात सामील होणे हे आमच्यासाठी एक मोठे पाऊल आहे.”
Visit Maldives च्या समर सेल कॅम्पियनअंतर्गत यूके, रशिया आणि सीआयएस देश, डच प्रदेश (जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड), इटली, पोलंड, स्पेन आणि भारत यासारख्या जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये विशेष ऑफर आणि सवलती दिल्या जात आहेत. उन्हाळी सुट्टीपूर्वीच्या या विक्रीद्वारे, मालदीव जगभरातील पर्यटकांसाठी सर्वात आवडते ठिकाण बनू इच्छित आहे.