Suniel Shetty Shared big update on Bollywood Movie Hera Pheri 3
सध्या सोशल मीडियासह सर्वत्रच ‘हेरा फेरी ३’ची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट भलताच चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. अभिनेता परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतल्यानंतर चाहते खूपच नाराज आहेत. चाहते सध्या परेश रावल यांची जागा कोण घेणार ? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच, चित्रपटाचा मुहूर्त शॉट पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्वच स्टारकास्ट चित्रपटातल्या लूकमध्ये दिसले. आता अशातच अभिनेता सुनील शेट्टीने एका मुलाखतीत चित्रपटाबद्दल सर्व काही स्पष्ट सांगितलं आहे.
‘छावा’ चित्रपटाला जबरदस्त टक्कर? फक्त ४ दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला Housefull 5
अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाबद्दल वक्तव्य केलंय की, “लवकरच माझा ‘वेलकम टू द जंगल’ नावाचा चित्रपट येतोय. सोबतच ‘हंटर’चा प्राईम व्हिडिओवरील पुढचा सीझन सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दोन प्रोजेक्टची तर मला फार उत्सुकता आहे. बाकी, ‘हेरा फेरी ३’ बनवला जाणार आहे की नाही, हे मला माहित नाही. परेश रावल यांनी हा चित्रपट सोडला आहे. यानंतर, अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसने परेशला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.” सुनील शेट्टीने केलेल्या विधानावरुन असं दिसतंय की, परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ सोडल्यामुळे या चित्रपटाचं भविष्य अंधारात आहे, असं दिसतंय.
‘The Delhi Files’ चित्रपटाच्या नावात बदल? विवेक अग्निहोत्रीन शेअर केले सिनेमाबाबत नवे अपडेट
सुनील शेट्टी हा केवळ अभिनेताच नाही तर एक यशस्वी उद्योजक देखील आहे. यावेळी, अभिनेत्याने तरुणांना आणि न्यू स्टार्टअप बिझनेस सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांना टिप्स दिल्या आहेत. जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले की उद्योजक म्हणून त्याचे सर्वात मोठे आव्हान काय आहे? तुम्ही त्याला कसे तोंड दिले? यावर अभिनेत्याने सांगितले की, “माझ्या वडिलांचे स्वत:च्या मालकीचे रेस्टॉरंट्स आहे. वडिलांच्या मालकीचेच रेस्टॉरंट्स असल्यामुळे माझ्यासाठी सर्वकाही सोपे होते. सर्वकाही आधीच सेटल होते. मला फक्त कठोर परिश्रम करावे लागले.”
“मी चित्रपटांमध्ये उद्योजकतेचा (entrepreneurship) प्रयत्नही केला, पण मी वेळ देऊ शकत नव्हतो म्हणून मी अपयशी ठरलो. पण, आज अनेक संधी आहेत. आपल्याला कठीण काळातच संधी मिळतात. पुरेसा वेळ देऊ न शकल्यामुळे निर्माता म्हणून यश मिळाले नाही”, असे त्याने सूचित केले. सुनील शेट्टी निर्माता असून त्याच्या मालकिची पॉपकॉर्न एंटरटेनमेंट म्हणून निर्माती कंपनी आहे. त्याच्या बॅनरखाली त्याने ‘खेल – नो ऑर्डिनरी गेम’, ‘रक्त’, ‘भागम भाग’, ‘मिशन इस्तंबूल’ आणि ‘लूट’ सारखे चित्रपट बनवले आहेत.