(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायलेल्या ”पायी फुफाटा” या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ही लोकप्रियता मिळवली. या प्रेरणादायी गाण्याने अनेक लोकांना प्रेरित केल. ”पायी फुफाटा” गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर गुजर ब्रदर्स एंटरटेनमेंट यांनी “तू धाव रे” हे नवं प्रेरणादायी गीत नुकतच प्रदर्शित केलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजच्या तरुण पिढीला नवी आशा देणार, त्यांच्या पंखांना बळ देणार हे गाण आहे. एका छोट्याशा गावातला तरुण हाल अपेष्टा सोसून, पदरी जे मिळेल ते काम करून आपलं स्वप्न पूर्ण करतो. त्याच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळते. हे या गाण्यात सुंदररित्या मांडले आहे. हे गाणं प्रेक्षकांना एक ताजं प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देण्याचे वचन देतं.
या गाण्यात अभिनेता सुजित चौरे आणि अभिनेत्री श्वेता काळे यांची जोडी आहे. हे गाण सुप्रसिद्ध गायक जशराज जोशी आणि गायिका सोमी शैलेश यांनी गायले आहे. अजित मांदळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिलं आहे. डीओपी रवी जावरे यांनी केलं आहे. गुजर ब्रदर्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या “तू धाव रे” गाण्याचे निर्माते शुभम मेदनकर आणि शरद तांदळे आहेत.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा करणार लवकरच लग्न, ‘पति पत्नी और पंगा’ मध्ये केली खास घोषणा!
अभिनेता सुजित चौरे गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो, “लगन या माझ्या पहिल्या सिनेमातील “पायी फुफाटा” गाण्याला लोकप्रियता मिळाली म्हणून मी “तू धाव रे” हे गाण करण्याचा निर्णय घेतला. माझ्या जवळच्या मित्रांना पाहून मी इन्स्पायर झालो. माझ्या मित्रांनी शून्यातून सुरुवात करून आज ते बिज़नेस क्षेत्रात प्रगती करत आहेत. मी हे बबन अडागळेंना सांगितल आणि हे गाण बनलं. आम्ही हे गाणं मे महिन्यात पुण्यात ४२ सेल्सिअस तापमानात शूट केलं आहे. गाण्याच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी पायी फुफाटा गाण्यावर जस प्रेम केल तसच या गाण्यावरही करावं.”
वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप सोहळा संपन्न !
निर्माते शरद तांदळे आणि शुभम मेदनकर म्हणतात, “या गाण्यातून आम्हाला कुठल्याही पैशाची अपेक्षा नाही. ‘तू धाव रे’ हे गाणं आम्ही महाराष्ट्रातील त्या प्रत्येक मेहनती आणि जिद्दी व्यक्तीला समर्पित करतो जी आपल्या स्वप्नांच्या दिशेने न थकता वाटचाल करत आहे. आम्ही हे गाणं त्यांना प्रेरणा देण्यासाठी बनवलं आहे. महादेव सर्वांचं भलं करो!”