(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मास्टरक्लास, सेलिब्रिटी पॅनल, स्क्रीनिंग ते वर्कशॉप वैविध्यपूर्णता वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा समारोप सोहळा संपन्न झाला. वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल (WIFF) च्या पहिल्या आवृत्तीचा अलीकडेच यशस्वी समारोप झाला असून या फेस्टिव्हलने चित्रपटप्रेमी, चित्रपट उद्योगातील तज्ज्ञ आणि स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणत सिनेमाच्या माध्यमातून अनोखा फेस्टिवल साजरा केला. या चित्रपट समारोप समारंभात विविध आकर्षक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
अगदी अॅक्टर्स पॅनल डिस्कशन पासून मास्टरक्लास, चित्रपटाचे स्क्रिनिंग पर्यंत अनेक गोष्टी वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल मध्ये अनुभवयाला मिळाल्या. दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांनी या फेस्टिवल मध्ये एकत्र येऊन हा चित्रपट सोहळा अजून उठावदार झाला.
वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमधील एक विशेष आकर्षण म्हणजे अॅप्लॉज एंटरटेनमेंट द्वारे आयोजित केलेल ” अॅक्टर्स पॅनल डिस्कशन” ज्यात अनेक प्रतिभावान कलाकार प्रतीक गांधी, प्रिया बापट, अमित सिअल, सुरवीन चावला आणि श्वेता बासू प्रसाद सहभागी यांची विशेष उपस्थिती असून त्यांनी उत्तम चर्चा करत हा पॅनल अजून सुंदर केला.
या चर्चेत प्रतीक गांधी यांनी प्रादेशिक उच्चार असलेल्या कलाकारांना येणाऱ्या अडचणींबद्दल भाष्य करताना सांगितले,
“गुजराती किंवा मराठी उच्चार असलेल्या कलाकारांकडे मुख्य प्रवाहातील भूमिकांसाठी दुर्लक्ष केले जाते, पण पंजाबी किंवा बिहारी उच्चार असलेल्यांना अधिक संधी मिळताना दिसतात” तर अभिनेते अमित सिअल यांनी दिग्दर्शकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले “चित्रपट यशस्वी झाला, तर श्रेय दिग्दर्शकाचे असते; आणि तो चालला नाही, तरी जबाबदारी दिग्दर्शकाचीच असते”
अभिनेत्री प्रिया बापट हिने “साबर बोंड ” या मराठी चित्रपटाच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिमानाने बोलताना त्या चित्रपटासाठी विशेष टाळ्यांचा कडकडाट करण्याची विनंती केली”
मास्टरक्लासेस आणि स्क्रिनिंग्स
फेस्टिव्हलदरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रावैल यांच्यासोबत ‘फिल्ममेकिंग अड्डा सेशन’ आयोजित करण्यात आल असून जिथे त्यांनी प्रेक्षकांसोबत आपले अनुभव आणि विचार शेअर केले.
अक्षय कुमारचा अनोखा प्रश्न आणि फडणवीसांचं हटके उत्तर; संत्र्यावरून रंगली चर्चा!
वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा मध्ये अजून एक कौतुकास्पद गोष्ट ठरली ती म्हणजे “P for Paparazzi” या चित्रपटाच खास स्क्रिनिंग पार पडलं आणि दिग्दर्शिक दिव्या खर्नारे आणि पापाराझी मनोज महरा यांच्यासोबत खास गप्पा रंगल्या. पापाराझी च्या आयुष्यातल्या खास गोष्टी यातू नाही उलगडल्या आणि प्रेक्षकांना यांचा अनुभव या निमित्तानं घेता आला.
या फिल्म फेस्टीवल मध्ये अनेक पुरस्कार देखील देण्यात आले असून डॉक्युमेंटरी आणि एक्सपेरिमेंटल फिल्म्स ,फिक्शन शॉर्ट फिल्म्स,फिक्शन फीचर फिल्म्स, सामाजिक विषयांवरील सर्वोत्तम चित्रपट यांचा यात समावेश होता.
फेस्टिव्हलच्या यशाबद्दल सह-संस्थापक दीपा गहलोत म्हणाल्या “WIFF म्हणजे विविध चित्रपटाचा आणि कथांचा उत्सव होता. सह-संस्थापक विनता नंदा म्हणाल्या “फेस्टिव्हलला मिळालेला प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक होता. इंडी सिनेमा प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”
“त्याची पँट काढा…”, महेश भट्टला दाढीवाल्या लोकांनी घेरलं, केलेलं घृणास्पद कृत्य
फेस्टिव्हल क्युरेटर श्रीधर रंगायन यांनी सांगितले “WIFF चे उद्दिष्ट असे चित्रपट सादर करणे होते जे समाजातील रूढ कल्पनांना आव्हान देतात आणि अर्थपूर्ण संवादांना प्रोत्साहन देतात. विविध चित्रपट आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून आम्ही ते साध्य केले याचा आम्हाला अभिमान आहे.”
वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलला टुली रिसर्च सेंटरचा पाठिंबा आहे. WIFF च्या पुढील कार्यक्रमांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतील यात शंका नाही.