(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टेलिव्हिजनची प्रसिद्ध जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश त्यांच्या नात्यामुळे सतत चर्चेत असतात. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच हे दोघे कलर्सच्या रिऍलिटी शो ‘पति पत्नी और पंगा’मध्ये पाहायला मिळाले. अविका गौर आणि मिलिंद चंदवानी यांच्या संगीत सोहळ्यासाठी करण आणि तेजस्वीला पाहुणे म्हणून बोलावले गेले होते. या कार्यक्रमात तेजस्वी आणि करण यांनी त्यांच्यालग्नाबद्दल मौन सोडले आणि दोघांनी लग्न कधी करणार याबाबत खुलासा केला. चला जाणून घेऊया या दोघांनी लग्नावर काय म्हटले?
‘मी उर्दूसोबत झोपतोही…’ सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत; पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल
‘पति पत्नी और पंगा’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अविका गौर आणि मिलिंद चंदवानी यांच्या लग्नाच्या विविध सोहळ्यांचा आनंद पाहायला मिळाला. हळदीपासून संगीत सोहळापर्यंत सर्व विधी दाखवण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या पाहुण्यांमध्ये प्रसिद्ध टिव्ही कपल करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी ही उपस्थिती लावली होती.. यावेळी विविध खेळ खेळण्यात आले.
अभिनेत्री मृण्मयीच्या वाढल्या अडचणी, ‘मना’चे श्लोक’ चित्रपटावर बॅनची टांगती तलवार; नेमकं काय प्रकरण?
या वेळी तेजस्वी आणि करणला प्रश्न विचारण्यात आला की ते कधी लग्न करतील? त्यांना दोन पर्याय दिले गेले, एक पर्याय होता की ते एक वर्षांमध्ये लग्न करतील आणि दुसरा पर्याय होता दोन वर्षांनी लग्न करतील. या प्रश्नावर करण आणि तेजस्वी यांनी दोघांनी मिळून पहिला पर्याय निवडला, म्हणजे ते एक वर्षांच्या आत लग्न करणार आहेत. त्यानंतर करण म्हणाला, “मी तर आधीपासून तयार होतो, पण तेजस्वी तयार नव्हती. पण आता आम्ही दोघेही तयार आहोत आणि एक वर्षांनंतर लग्नाच्या बंधनात अडकणार आहोत.”
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या नात्याची सुरुवात ‘बिग बॉस 15’ या रिअॅलिटी शोमधून झाली होती. या शोदरम्यान दोघंही सुरुवातीला एकमेकांचे चांगले मित्र होते, मात्र शो संपता-संपता ही मैत्री प्रेमात रूपांतरित झाली.आज त्यांना एकत्र येऊन चार वर्षं पूर्ण झाली आहेत. या काळात करण आणि तेजस्वी यांना अनेक वेळा एकत्र वेकेशन एन्जॉय करताना पाहिलं गेलं आहे.त्याचप्रमाणे, अनेक टीव्ही शोजमध्येही हे दोघं एकत्र पाहायला मिळतात, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांचं उत्साह आणखीनच वाढतो. हे कपल आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे.