'क्राइम पेट्रोल' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं निधन (फोटो सौजन्य-X)
रिॲलिटी शो ‘दादागिरी 2’ जिंकून प्रसिद्ध झालेले टीव्ही अभिनेता नितीन चौहान यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते फक्त 35 वर्षांचे होते. यूपीच्या अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नितीनने एमटीव्हीचा ‘स्प्लिट्सविला सीझन 5’ देखील जिंकला होता. याशिवाय जिंदगी डॉट कॉम, क्राईम पेट्रोल आणि फ्रेंड्स यांसारख्या मालिकांमध्येही दिसला होता. क्राईम पेट्रोलमुळेही तो चांगलाच प्रसिद्ध झाला. नितीन चौहानने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. नेमकी ही आत्महत्या की घातपात? असा सवाल उपस्थित होत आहे.
नितीनच्या माजी सहकलाकाराने एका पोस्टद्वारे नितीन चौहानच्या निधनाची माहिती दिली. रिॲलिटी शो दादागिरी 2 चे विजेते प्रसिद्ध टीव्ही अभिनेते नितीन चौहान यांचे गुरुवारी (7 नोव्हेंबर) मुंबईत निधन झाले. नितीन फक्त 35 वर्षांचे होते. नितीन हा यूपीच्या अलीगड जिल्ह्यातील रहिवासी होता. दादागिरी 2 शो व्यतिरिक्त नितीनने स्प्लिट्सविलाचा सीझन 5 देखील जिंकला.
अभिनेता नितीन अलीगढ यूपीचा रहिवासी होता आणि त्याने ‘दादगिरी 2’ रिॲलिटी शो जिंकून बरीच ओळख मिळवली होती. याशिवाय त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांमध्ये स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण केले होते. नितीनने ‘जिंदगी डॉट कॉम’, ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘फ्रेंड्स’ यांसारख्या टीव्ही शोमध्येही काम केले आणि ‘क्राइम पेट्रोल’ मधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली.
हे सुद्धा वाचा: एकता कपूर घेणार विवियन डीसेनाची शाळा, म्हणाली हा कामाचा घमंड…
नितीन शेवटचा 2022 मध्ये सब टीव्हीच्या ‘तेरा यार हूं मैं’ मध्ये दिसला होता. या टीव्ही मालिकेतील तिचे सहकलाकार सुदीप साहिर आणि सायंतानी घोष यांनी तिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु त्यांच्याकडे अधिक माहिती नसल्याचेही सांगितले आहे. त्याच्या माजी सहकलाकारांपैकी एक विभूती ठाकूरच्या पोस्टनुसार नितीनने आत्महत्य केल्याची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याचे वडील मुंबईला पोहोचले असून त्यांचे पार्थिव परत अलिगडला घेऊन जातील. सध्या तरी पोलिसांकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नितीन चौहान हा यूपीच्या अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने MTV चा ‘Splitsvilla Season 5’ देखील जिंकला. याशिवाय नितीन क्राईम पेट्रोल आणि फ्रेंड्स सारख्या मालिकांमध्येही दिसला होता. ‘जिंदगी डॉट कॉम’मध्येही नितीन दिसला होता. नितीन चौहानला क्राईम पेट्रोलमधून विशेष ओळख मिळाली. याशिवाय ‘जिंदगी डॉट कॉम’मध्येही नितीन दिसला होता. नितीनच्या शेवटच्या टीव्ही शोबद्दल बोलायचे झाले तर तो २०२२ मध्ये ‘तेरा यार हूं मैं’ या टीव्ही शोमध्ये दिसला होता.
अभिनेत्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्याने आत्महत्या केल्याचेही बोलले जात आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. एकंदरित ही आत्महत्या की घातपात?
हे सुद्धा वाचा: छोटीशी पगडी, इवलेसे डोळे, दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या धाकट्या भावाचा चेहरा झाला रिव्हील