
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
वर्षाचा शेवट जवळ आला असून नोव्हेंबर महिन्यात अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे धमाल, थरार आणि मनोरंजनाने भरलेला धमाकेदार कंटेंट. या महिन्यातील प्रत्येक ‘Jhakaas Friday’ ठरणार आहे खास कारण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बांग्ला आणि साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट, तेही तुमच्या मायबोली मराठीत. चला तर, नोव्हेंबरच्या या झकास मनोरंजनाचा आनंद लुटूया.
एक गन चार जण (वन्स अपॉन अ टाइम इन मद्रास) : प्रसाध मुरुगन दिग्दर्शित ‘वन्स अपॉन अ टाइम इन मद्रास’ या थ्रिलर तमिळ भाषीय चित्रपटाचा मराठी डिजिटल प्रीमियर २१ नोव्हेंबर २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. एका बंदुकीभोवती फिरणारी ही कथा अत्यंत थरारक आहे
‘वाजव रे’ (Vaajav Re): ‘वाजव रे’ हा जय कमलेश राठोड दिग्दर्शित बायोग्राफी-ड्रामा-फॅमिली मराठी चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मिलिंदची ही प्रेरणादायी कथा आहे. समाजाने कधीही त्याच्या कच्छी ढोल वाजवण्याच्या आवडीला स्वीकारले नाही, पण त्याच्या जिद्दीने आणि आवडीने त्याला ‘गिरगावचा राजा’च्या ढोलपथकात ओळख मिळवून दिली. आज तो संपूर्ण महाराष्ट्रात ‘गिरगावचा लाडका मिलिंद’ म्हणून ओळखला जातो. संघर्ष, स्वप्नं आणि आत्मविश्वासाच्या तालावर सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिक अनुभव देणार आहे.संतोष जुवेकर, गौरव मोरे, तन्वी शिंदे, केतकी कदम आणि गणेश यादव यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ‘वाजव रे’ हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात नक्कीच एक छाप सोडून जाईल.
‘लई झकास’ (Lai Jhakaas) :‘लई झकास’ या बाबू भट्ट दिग्दर्शित मराठी चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट यशस्वी उद्योगपती विश्वासराव यांच्या जीवनावर आधारित असून त्यांनी परदेशात व्यवसाय विस्तारून अफाट यश मिळवलेले असते, दरम्यान त्यांच्या आयुष्यात असे एक वळण येते, जेव्हा त्यांची लाडकी मुलगी प्रिया शिक्षणासाठी भारतात येते आणि संग्रामच्या प्रेमात पडते. तिथूनच त्यांच्या नात्याची खरी परीक्षा सुरू होते.
शूर (शान): एम. राहिम दिग्दर्शित ‘शूर – शान’ हा बांग्ला अॅक्शन-थ्रिलर चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ही कथा एएसपी शान या प्रामाणिक आणि धाडसी पोलिस अधिकाऱ्याची आहे, जो मानव तस्करीच्या भीषण गुन्ह्याचा तपास करताना डेविड नावाच्या मास्टरमाइंडचा शोध घेतो. देशसेवेच्या उद्देशाने पोलिस दलात दाखल झालेला शान, सत्य आणि न्यायासाठीच्या आपल्या लढ्यात अनेक थरारक चकमकींना आणि संकटांना सामोरा जातो. या तपासाच्या प्रवासात काही धक्कादायक सत्यं उघड होतात.
‘माझे पहिले प्रेम…’, फराह खानने युट्यूबवरील कमाईबद्दल केला मोठा खुलासा
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “नोव्हेंबर महिना म्हणजे वर्षाच्या अखेरीचा उत्साह, थंडीची चाहूल आणि नव्या मनोरंजनाची लाट. या महिन्यात प्रेक्षकांच्या आनंदात भर घालण्यासाठी आम्ही अल्ट्रा झकास मराठीवर आणत आहोत एकापेक्षा एक धमाल, थरारक आणि मनाला भिडणारा कंटेंट. आमच्यासाठी कंटेंटचा अर्थ फक्त करमणूक नाही, तर प्रत्येक कथा प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करेल, त्यांना नव्या अनुभवांची भेट देईल.”
‘असंभव 80s‘च्या ट्रेंडची कलाकारांना भुरळ! सचित पाटीलच्या चित्रपटाने वाढवली उत्सुकता