अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केली ५४,४५४ चौरस फूट जमीन, काय आहे कारण?
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा अयोध्यामध्ये जमीन खरेदी केली आहे. रामनगरी, जी रिअल इस्टेटच्या बाबतीत उत्तर प्रदेशातील सर्वात मौल्यवान शहरांमध्ये गणली जाते. बिग बी यांनी अयोध्येत खरेदी केलेल्या जमीनवर वडील कवी हरिवंश राय बच्चन यांचे स्मारक बांधणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील अवध भागात त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक सांस्कृतिक केंद्र बांधण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी, अमिताभ बच्चन यांनी १६ जानेवारी रोजी हवेली अवध येथे ४.५४ कोटी रुपयांना ५,३७२ चौरस फूट जमीन खरेदी केली होती. ती जागा राम मंदिरापासून फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.आता बच्चन कुटुंबाने दुसऱ्यांदा अयोध्येत जमिनीचा व्यवहार केला आहे.
दुबईत सोनं खरेदी केलं, स्वित्झर्लंडला जाते सांगितलं अन् भारतात आली; राण्या रावबद्दल DRI चा खुलासा
आता हरिवंशराय बच्चन ट्रस्टने अयोध्येत ५४,४५४ स्क्वेअर फूट जमीन खरेदी केली आहे. ही जमीन राम मंदिरापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. या जमिनीचा वापर प्रतिष्ठित अमिताभ बच्चन यांचे वडील आणि हिंदी कवी हरिवंश राय बच्चन यांच्या जीवन आणि साहित्यिक योगदानाला समर्पित करणारे स्मारक स्थापन करण्यासाठी केला जाऊ शकतो. शिवाय त्यांच्या साहित्यिक वारसाचाही इथे जतन केले जाणार, असे म्हटले जात आहे.
हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजेश ऋषिकेश यादव यांनी हा व्यवहार केला आहे. ‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या वृत्तानुसार, या जमिनीची किंमत सुमारे ८६ लाख आहे. २०१३ मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्ट’ची स्थापना केली आहे.
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम; ‘मी पाठीशी आहे’चा ट्रेलर प्रदर्शित
यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने अयोध्येत राज्य अतिथीगृह बांधण्यासाठी राज्य सरकारकडून जमीन घेतली होती. देशातील अनेक प्रसिद्ध कॉर्पोरेट घराण्यांनीही अयोध्येत जमिनीत गुंतवणूक केली आहे. याशिवाय, अनेक प्रसिद्ध हॉटेल्स ग्रुप अयोध्येत स्वत:च्या मालकिचे हॉटेल्स बांधत आहेत. अयोध्येत स्थायिक होण्याची लोकांची आवड पाहून, उत्तर प्रदेश गृहनिर्माण विकास परिषद येथे एक मोठा गृहनिर्माण प्रकल्प आणत आहे. रिअल इस्टेट कंपनी लोढा ग्रुपनेही येथे जमीन खरेदी केली आहे आणि निवासी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. हे उल्लेखनीय आहे की महाकुंभाच्या यशाने उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटनाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत, तर राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येतही पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योगी सरकारच्या प्रयत्नांमुळे, सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट जगताचीही रामनगरीमध्ये आवड वाढली आहे. अयोध्येत विमानतळ, जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक आणि आंतरराज्यीय बस स्थानक बांधण्यात आले आहे. योगी सरकारने देशातील अनेक राज्यांना अयोध्येत स्वतःचे अतिथीगृह बांधण्यासाठी जमीन दिली आहे