DRI Revelations On Ranya Rao Bought Gold In Dubai, Declared Geneva Travel, But Landed In India
सोनेतस्करी प्रकरणात अटकेत असलेली प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री रान्या राव हिच्याबद्दल महसूल गुप्तचर संचालनालयने (DRI)ने एक धक्कादायक खुलासा केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयने (DRI)ने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रान्या राव हिने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये दुबईतून दोनदा सोने खरेदी केल्याची माहिती आहे. शिवाय, राण्याने स्वित्झर्लंडच्या जिनेव्हाला जाणार असल्याचं तिने कस्टम विभागाला सांगितलं होतं. परंतु ती भारतात आली.
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम; ‘मी पाठीशी आहे’चा ट्रेलर प्रदर्शित
३ मार्च रोजी संध्याकाळी बेंगळुरूच्या कॅम्पेगौडा विमानतळावर रान्या हिला ताब्यात घेतल्यानंतर एजन्सीने सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली राव यांची चौकशी करत आहे. तिच्या अटकेनंतर, बेंगळुरू महसूल गुप्तचर संचालनालयाने छापे टाकून तिच्या टेक सिटीतल्या घरातून २.०६ कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपये रोख कॅश जप्त केले. सोमवारी न्यायालयाने रावला २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सीएनएन-न्यूज१८ ने मिळवलेल्या तिच्या अटक मेमोमध्ये, डीआरआयने म्हटले आहे की रावने १३ नोव्हेंबर आणि २० डिसेंबर रोजी दुबईमध्ये सोने खरेदी केले होते आणि ती जिनिव्हाला जात असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिने स्वित्झर्लंडच्या जिनेव्हाला जात असल्याचे सांगितले होते. परंतु अटक मेमोनुसार ती भारतात आली होती.
उन्हाच्या झळांमध्ये थंडगार प्रेमाचा गारवा देणार ‘गुलकंद’ च पहिलं गाणं… ‘चंचल’ प्रेमगीत ऐकलं का ?
रावने कबूल केले आहे की, तिने अटकेपूर्वी दुबईहून भारतात किमान दोन वेळा तरीही सोने आणले होते. डीआरआय अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की तिने सुमारे ४.८३ कोटी रुपयांचे कस्टम ड्युटी चुकवली आहे.
गेल्या आठवड्यात, सीएनएन-न्यूज१८ ने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने DRI ला दिलेल्या तिच्या पहिल्या जबाबात, कबूल केले की तिच्याकडून १७ सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले आहेत. रान्या रावने केवळ दुबईच नव्हे तर युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेतही दौरा केला आहे. तथापि, तिने अधिक माहिती देण्यास नकार दिला. शिवाय तिला सध्या आरामाची गरज असल्याचेही तिने पोलिस तपासात उघड केले आहे.
Holi Songs: ‘ही’ गाणी होळीच्या प्लेलिस्टमध्ये करा ॲड, रंगात रंगून आणखी थिरकतील पाय!
रान्या राव कोण आहे? सोन्याच्या तस्करी प्रकरणात तिचा काय संबंध?
टॉलिवूड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर ०३ मार्चला रात्री अटक करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने राण्याकडून १४.८ किलो सोनं जप्त केलं. अभिनेत्रीकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपयांहून अधिकची आहे. रान्या रावने गेल्या वर्षभरात अरब देशांमध्ये तरीही १० फेऱ्या मारल्या होत्या. शिवाय, ५ मार्चच्या आधीच्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळे ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली.
रान्या मंगळवारी जेव्हा दुबईहून बंगळुरुला पोहचली तेव्हा तिला पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी थांबवलं. तिच्या सामानांची तपासणीत पोलिसांना कोट्यवधींचा मुद्देमाल सापडला. कर्नाटकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सावत्र मुलगी असल्याची बतावणी करणाऱ्या राण्या राव हिने स्वत:ची खरी ओळखही सांगितली. ती रियल इस्टेट व्यावसायिक के.एस. हेगदेश यांची मुलगी आहे. अभिनेत्रीचा पती जतीन हुक्केरी असून तो पेशाने आर्किटेक आहे. त्याचं किंवा त्याच्याशी संबंधित कुणाचंही काम दुबईत सुरु नाही अशीही माहिती पोलिसांना मिळाली ज्यामुळे रान्या दुबईत तस्करीसाठी जात असावी असा संशय पोलिसांना आला. ज्यानंतर तिची झडती घेण्यात आली. त्यात तिच्याकडे १२ कोटींहून अधिक रकमेचं सोनं मिळालं. या प्रकरणी रान्या रावला अटक झाली. न्यायालयात गेल्यावर तिने रडायलाच सुरुवात केली.