नुकतेच आई बाबा झालेल्या वरुण आणि नताशाची चर्चा होत असताना अजून एका चर्चेला उधान आले आहे. बाबा झालेला वरुण हा सध्या आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण जगताना दिसत आहे. गेल्याच आठवड्यात नताशाला मुंबईमधील हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्याच दम्यान दोघेही आपल्या मुलीला घरी घेऊन जाताना दिसले होते. आता या दोघांनीही घर शिप्टिन्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. वरुण आणि त्याची पत्नी आपल्या मुलीसह ऋतिक रोशन याचे जुहू येथील अपार्टमेंट भाड्याने विकत घेतले आहे. आणि हे तिघेही इथेच राहणार आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार ऋतिक रोशन अजूनही त्याच्या स्वतःच्या या जुहू अपार्टमेंटमध्ये राहत आहे. वरुण आणि नताशा असे असून सुद्धा या घरात राहायला जाणार आहेत. तसेच ऋतिक रोशनदेखील आपले हे जुहू अपार्टमेंटमधील घर सोडून दुसऱ्या ठिकाणी रवाना होणार आहेत. या जुहू अपार्टमेंट या घराबध्दल बोलायचे झाले तर, हे खूप मोटेह आणि शानदार घर असून या घराच्या खिडकीतून सुंदर असा व्हिव पाहायला मिळतो. या घरात वरुण त्याची पत्नी नताशा आणि त्याची नवजात मुलगी खूप आनंदात आणि सुखात राहतील यात शंकाच नाही.
[read_also content=”लेकीला घेऊन घरी रवाना, नुकताच बाबा झालेल्या वरूण धवनचा फोटो व्हायरल https://www.navarashtra.com/movies/the-video-of-varun-dhawal-going-home-happily-with-his-daughter-has-gone-viral-544641.html”]
तसेच वरुणने बाबा झाल्यावर एक सोशल मीडियावर पोस्टसुद्धा केली होती. त्याने लिहिले की, माझ्या मुलीसाठी आणि तिच्या आईसाठी प्रार्थना केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे. वरुण धवनच्या या पोस्टवर चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्याचवेळी शहनाज गिल, मौनी रॉय, करीना कपूर, रकुल प्रीत सिंग, ईशा गुप्ता, परिणीती चोप्रा, रेमो डिसूझा, प्रियांका चोप्रा, नेहा शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे आई-वडील झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.