Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुझी मेहनत, अभ्यास, भूमिका या पलीकडे तुझ्या संवेदना…’ वीणा जामकरची दिग्दर्शक विजय कलमकरसाठी खास पोस्ट

अभिनेत्री वीणा जामकरने केली "कुर्ला टू वेंगुर्ला" चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कलमकर यांच्याबद्दल एक खास पोस्ट

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2025 | 04:36 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री वीणा जामकर हिने “कुर्ला टू वेंगुर्ला” चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कलमकर यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, ”तुझी मेहनत, अभ्यास, भूमिका, लिडरशीप ह्या पलिकडे आहेत तुझ्यातल्या संवेदना… ज्या लाभतात अर्थातच दुःख, संकटांचा सामना करूनच. आणि ह्या संवेदना जोपासायच्या कि प्रवाह – पतीत होऊन सोडून द्यायच्या ह्याची पण निवडच करावी लागते! तू ती केलीस…

तू ‘सिनेमा दिग्दर्शक ‘ म्हणून खास आहेस. दोन्ही पायांना पोलिओ असलेली व्यक्ती सिनेमा दिग्दर्शक कशी बरं होऊ शकते असं मलाही वाटलंच होतं तुझ्याकडे बघून. पण मी वेळोवेळी अनुभवलं ते तुझ्यात ‘नसलेलं ‘ मानसिक अपंगत्व, जे आमच्यापैकी बहुतेक जणांकडे थोडं फार आहेच. कल्पना करूनही समजू शकत नाही इतक्या अवहेलनेला सामोरं जाऊनही तुझ्या चेहऱ्यावर हसू उमलतं… अन्यायग्रस्त माणसाचं ‘ रडणं ‘ आणि त्या ‘रडण्याचंच’ भांडवल करणं हे तुझ्याकडून अपेक्षित असलेले ‘ गुण ‘ तुझ्या आसपासही फिरकत नाहीत.. आणि तिथेच तू खूप मोठा होतोस..!

“कुर्ला टू वेंगुर्ला”चं बॉक्स ऑफिस वर कलेक्शन किती ह्यावर तुझं यश ठरत नाही.. तू तेव्हाच सगळं जिंकलंस जेव्हा पहिल्यांदा हातातली काठी बाजूला सारून, तू दिग्दर्शकाच्या खुर्चीवर विराजमान झालास… काय वाटलं असेल तेव्हा तुला…?

लाडक्या, Thank You Very Much…तू तुझ्याच अस्तित्वाला अर्थ दिलास त्यासाठी! नाहीतर माझ्यासारख्या अनेकांनी कुणाकडे पाहिलं असतं? कुठून बळ मिळालं असतं? तू Super Hit है बॉस.

अभिनेता कितीही उत्तम असो त्याला पाठबळ नसेल तर तो सगळं टॅलेंट असूनही अपंगच रहातो. आज आमचं पाठबळ ठरला आहे श्री. अमरजीत आमलेंचा ” स्पंदन ” परिवार. स्पंदन फिल्म मूव्हमेंट. कुणाच्या फिल्मसाठी एखादा गडगंज श्रीमंत हात पुढे करतो, कुणाच्या पाठीमागे पिढीजात सिनेमा धंद्यातला अनुभव कमी येतो. आमच्या पाठीशी आज ‘स्पंदन परिवार’ उभा राहिला आहे. अमरजीत आमले आहेत. ऐकल्यावर कोणीही वेड्यात काढेल अशी चित्रपटनिर्मितीची चळवळ गेली 30 वर्ष गावोगावी चालवणारी ‘कलंदर’ व्यक्ती सिस्टीम ला आव्हान देणार नाही तर कोण देणार? ज्यांनी जगताना कधीच सरधोपट फायदा – तोट्याचा विचार केला नाही, अशीच व्यक्ती ‘ धमक ‘ दाखवून स्वतःच्या हिमतीवर चित्रपट वितरीत करायचा विचार करू शकते…! इतकं चित्रपटाचं वेड असलेली माणसं दुर्मिळ. तरीही ह्या वेडेपणात किती ‘शहाणपण ‘ लपलेलं आहे हे चित्रपट पाहिल्यावर अधोरेखित होतं..

”कसंही नाचणं, उड्या मारणं, विचित्र हावभाव करणं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा…” सागर कारंडेची पोस्ट चर्चेत

‘स्पंदन’ परिवाराने मला काय दिलं? जेव्हा जेव्हा मी ग्रूप च्या सानिध्यात येते, तेव्हा तेव्हा काही क्षण मी अंतर्मुख होते. मला आतल्या आत सुरक्षित वाटतं. आपण कामाचा मोबदला देऊन गोड गोड बोलून वापरले जातोय हा सर्रास येणारा अनुभव तुमच्यात आल्यावर येत नाही.. थोडक्यात, तुमच्या ग्रूप मधे माझ्याही स्पंदनांचे ठोके नियमित पडतात!

AI व्हिडीओचा नाद बाईss खतरनाक! अक्षय कुमारने व्हायरल व्हिडिओवर दिले स्पष्टीकरण, म्हणाला ‘मी सांगू इच्छितो…’

‘स्पंदन’ परिवारातल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या चित्रपटासाठी जे अहोरात्र कष्ट घेताय… कितीही पगार दिला तरी कामाप्रती अशी सदभावना कोणी विकत घेऊ शकत नाही. ह्या आत्मियतेने तुम्ही फिल्म घराघरात पोहोचावी म्हणून प्रयत्न करताय.. तुमचं शब्दात मावणार नाही एवढं कौतुक, अभिनंदन, आभार आणि सलाम!!!! Paid Advertising च्या जमान्यात तुमच्या एकजूटीने वाजवलेला चित्रपटाचा डंका अखंड वाजत राहूदे ह्यापुढेही.. कारण ह्या तुमच्या आवाजाने फक्त प्रमोशन होणार नाही तर सिनेमाच्या

‘शुष्क कोर्पोरेट ‘ जगालाही मधून मधून आठवत राहिल की आपल्या आसपास काही ‘माणसं ‘ शिल्लक आहेत… स्पंदन परिवाराला अंत:करणातून शुभेच्छा, प्रेम आणि शतशः आभार!!! Love You All…- वीणा जामकर
अशी पोस्ट करत अभिनेत्री वीणा जामकर हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Veena jamkars special post for director vijay kalmkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

”कसंही नाचणं, उड्या मारणं,  विचित्र हावभाव करणं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा…” सागर कारंडेची पोस्ट चर्चेत
1

”कसंही नाचणं, उड्या मारणं, विचित्र हावभाव करणं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा…” सागर कारंडेची पोस्ट चर्चेत

अंत्यसंस्काराला प्रचंड गर्दी, मुख्यमंत्रीही भावूक, गायक जूबीन गर्गचं दोनदा पोस्ट मॉर्टम! आसाममध्ये नेमकं घडतंय काय?
2

अंत्यसंस्काराला प्रचंड गर्दी, मुख्यमंत्रीही भावूक, गायक जूबीन गर्गचं दोनदा पोस्ट मॉर्टम! आसाममध्ये नेमकं घडतंय काय?

दिग्दर्शकानं ‘बाबुली’ समोर जोडले हात, कोट्यवधी कमवणाऱ्या दशावतारचा दुसऱ्या सोमवारी गल्ला किती?
3

दिग्दर्शकानं ‘बाबुली’ समोर जोडले हात, कोट्यवधी कमवणाऱ्या दशावतारचा दुसऱ्या सोमवारी गल्ला किती?

विवेक, रितेश आणि आफताब पुन्हा एकत्र, ‘मस्ती 4’मध्ये धमाल चार पटीने वाढणार!
4

विवेक, रितेश आणि आफताब पुन्हा एकत्र, ‘मस्ती 4’मध्ये धमाल चार पटीने वाढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.