ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूड सिनेविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूड, टीव्ही आणि भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. राकेश पांडे यांचे निधन शुक्रवारी (२१ मार्च २०२५) सकाळी ८:५० वाजता जुहू येथील आरोग्यनिधी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.. या रुग्णालयामध्ये त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच अभिनेत्याची प्राणज्योत मालवली. राकेश यांच्या पश्चात पत्नी, मुलगी जसमीत आणि नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, २२ मार्च रोजी शास्त्रीनगर याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीत राकेश पांडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राकेश पांडे यांच्या फिल्मी करियरबद्दल बोलायचे तर, राकेश यांची बॉलिवूड, टीव्ही आणि भोजपुरी इंडस्ट्रीतील चित्रपट कारकीर्द खूपच वैविध्यपूर्ण होती. ९ एप्रिल १९४० रोजी त्यांचा हिमाचल प्रदेशमध्ये जन्म झाला. त्यांनी १९६९ साली रिलीज झालेल्या बासु चॅटर्जी दिग्दर्शित ‘सारा आकाश’ चित्रपटातून फिल्मी करियरची सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी ‘समर’ ही भूमिका साकारली होती. यानंतर, राकेश यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. ‘सारा आकाश’ चित्रपटाद्वारे त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला होता.
अक्षय कुमार- अर्शद वारसीची हटके कॉमेडी पुन्हा अनुभवायला मिळणार, ‘जॉली एलएलबी ३’ची रिलीज डेट जाहीर
राकेश पांडे यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथून प्रशिक्षण घेतले आणि नंतर भारतेंदू नाट्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते रंगभूमीवर सक्रिय होते. राकेश पांडे हे त्यांच्या सुरुवातीच्या काळात इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) शी जोडले गेले होते. त्यांच्या अभिनयात नैसर्गिकता आणि वास्तविकता होती. राकेश पांडे शेवटचे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द राइज ऑफ सुदर्शन चक्र’ चित्रपटात दिसले होते. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी ‘मेरा रक्षक’, ‘यही है जिंदगी’, ‘वो मैं नहीं’, ‘दो राहा’ आणि ‘ईश्वर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
‘करेज’साठी संस्कृती बालगुडेने काय विशेष मेहनत घेतली ? भूमिकेसह चित्रपटाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली…
त्याचबरोबर भोजपुरीमध्ये त्यांनी ‘बलम परदेसिया’ आणि ‘भैय्या दूज’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. काही वर्षानंतर ‘देवदास’ (2002), ‘दिल चाहता है’ (2001), ‘लक्ष्य’ (2004) आणि ‘ब्लॅक’ (2005) सारख्या हिट सिनेमांमध्ये ते दिसले होते. राकेश पांडे यांनी काही मालिकांमध्ये ही काम केले आहे. ‘छोटी बहू’, ‘दहलीज’ आणि ‘भारत एक खोज’ (1988) सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये ते दिसले होते. दोन दशकांहून अधिक काळ अभिनयापासून दूर राहिल्यानंतर 2017मध्ये ते कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ चित्रपटात दिसले. तसेच त्यांनी ‘हुरदंग’ (2022) आणि ‘द लॉयर्स शो’ या वेब सीरिजमध्ये देखील भूमिका साकारली.