Aamir Khan On Working With Salman And Shah Rukh Khan In A Film Says It Is Difficult
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या पहिल्या प्री-वेडिंगला तिनही खान ब्रदर्सने जबरदस्त डान्स करत सर्वांचेच लक्ष वेधले. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे तिघेही एकाच मंचावर एकत्र नाचले. तिघांनी एकमेकांच्या सिग्नेचर स्टेपही केल्या. डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्यानंतर तिनही सुपरस्टारने एकत्र चित्रपट करावा, अशी सध्या चर्चा सुरु आहे.
दरम्यान, सलमान आणि आमिरने एकत्र काम केले आहे. त्यासोबतच सलमान आणि शाहरुखनेही एकत्र काम केलं आहे. पण आमिर आणि शाहरुख अद्याप एकत्र दिसलेले नाही. शिवाय हे तीनही खानही एकत्र एका चित्रपटात अद्याप दिसलेले नाहीत. तीनही खानला एकाच चित्रपटात एकत्र पाहण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यावर नुकतंच आमिरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केले आहे.
अक्षय कुमार- अर्शद वारसीची हटके कॉमेडी पुन्हा अनुभवायला मिळणार, ‘जॉली एलएलबी ३’ची रिलीज डेट जाहीर
दरम्यान, ‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला की, “मी आजपर्यंत शाहरुखसोबत केव्हा कामच केलेलं नाही. मला त्याच्यासोबत काम करायला नक्की आवडेल. शिवाय, आम्हाला तिघांनाही एकत्र एकाच चित्रपटामध्ये काम करायला खूप आवडेल. स्क्रीप्ट चांगली असली पाहिजे. आम्ही याबद्दल वरवर चर्चाही केली आहे. पण ते जरा कठीण आहे, कारण तीन अभिनेत्यांचा चित्रपट असणं हे सहसा पाहायला मिळत नाही. पण असं झालं तर आम्हाला तिघांना तर आनंदच होईल. आम्ही कधीच एकत्र काम केलेलं नाही. एक तर आम्हाला काम करताना मजा येईल आणि लोकांनाही पाहायला आवडेल. चित्रपट चांगला बनेल किंवा वाईट बनेल आणि जर वाईट जरी बनला तरी लोकांना आम्हाला स्क्रीनवर एकत्र पाहायला आवडेल.”
‘करेज’साठी संस्कृती बालगुडेने काय विशेष मेहनत घेतली ? भूमिकेसह चित्रपटाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली…
आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिघांनाही एकत्र एकाच चित्रपटामध्ये पाहता यावं अशी त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे. आमिरने याआधी कपिल शर्मा शोमध्येही यावर प्रतिक्रिया दिली होती. “आम्ही तिघेही इतक्या वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करतोय, त्यामुळे आम्ही एकाही चित्रपटात एकत्र काम न करणे हे प्रेक्षकांसाठी अन्यायकारक असेल”, असं आमिर खान म्हणाला होता. दरम्यान, आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं तर, १९९४ मध्ये आलेल्या ‘अंदाज अपना अपना’मध्ये सलमान खान आणि आमिर खानने एकत्र काम केलं होतं, तर शाहरुखबरोबर सलमान खाननेदेखील काही चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. ‘कुछ कुछ होता है’, ‘ट्यूबलाइट’, ‘झिरो’, ‘टाइगर ३’सह अन्य काही चित्रपटांत शाहरुख खान आणि सलमान खानने एकत्र काम केले आहेत.