६ वर्षांनंतर विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल’ शो का सोडला? स्वतःच सांगितलं कारण
‘इंडियन आयडल’ या म्युझिक रिॲलिटी शोमध्ये जज (परिक्षक) असलेल्या गायक विशाल दादलानीने सहा वर्षांनंतर हा सोडले आहे. विशालने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत भलंमोठं कॅप्शन देत त्याने पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विशालसोबत इंडियन आयडलचे इतर परिक्षकही होते. श्रेया घोषाल आणि बादशाह हे दोघंही त्याच्यासोबत होते.
राजकीय षडयंत्र अन् प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं कथानक; Raid 2 चा जबरदस्त ट्रेलर रिलीज…
नुकताच इंडियन आयडल या लोकप्रिय रिॲलिटी शोच्या १५ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडला. २४ वर्षीय मानसी घोष या शोची विजेती ठरली. या ग्रँड फिनालेनंतर जज विशाल ददलानीने शो सोडल्याची घोषणा केली आहे. गेल्या सहा सीझनपासून तो शोचा परिक्षक आहे. आता हा सीझन संपल्यानंतर त्याने या शोमध्ये पुन्हा दिसणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत विशालने आपल्या चाहत्यांना ही माहिती कळवली आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विशालने शो सोडण्याचे कारण सांगितले की, “अलविदा मित्रांनो. मी गेले ६ सीझनमध्ये जितकी मजा केली होती, त्यापेक्षा जास्त मी आता हा शो मिस करेन. या शोच्या माध्यमातून मला खूप जास्त प्रेम मिळाले आहे. या सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे. मला आशा आहे की, हा शोही मला जितका मिस करेल, तेवढाच मी ही त्याला मिस करेन.. मी दरवर्षी ६ महिने मुंबईत राहू शकत नाही. पुन्हा संगीत तयार करण्याची वेळ झाली आहे. आता मला पुन्हा स्टेजवर उतरून कॉन्सर्ट करण्याची वेळ आली आहे. आता मी पुन्हा मेकअप करणार नाही.” असं विशालने लिहिलं.
“श्रेया, बादशाह, आदि, आराधना, चित्रा, आनंद जी, सोनल, प्रतिभा, साहिल, सलोनी, मुस्कान, अभिषा, संपूर्ण प्रोडक्शन टीम, विलास, पक्या, कौशिक (पिंकी) आणि सर्व को-जज, गायक आणि संगीतकार इतक्या वर्ष माझ्यासोबत एकत्र काम केल्याबद्दल, धन्यवाद! हे खरोखर घर आहे!! स्टेज म्हणजे शुद्ध प्रेम आहे.” असं विशालने पोस्टच्या शेवटच्या भागात लिहिलं आहे. दरम्यान, विशाल ददलानीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
विशाल ददलानी हा लोकप्रिय संगीतकार आणि गायक आहे. त्याने त्याचा संगीतकार मित्र शेखरबरोबर ‘ओम शांती ओम’, ‘चिन्ना एक्सप्रेस’, ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ सारख्या अनेक बॉलिवूडमधल्या हिट चित्रपटांना संगीत दिले आहे. तो त्याच्या गाण्यासोबतच सामाजिक आणि राजकीय विषयांवरही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोकळेपणाने त्याचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो.