Neena Gupta Vivian Richards Love Story
दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताने आपल्या अभिनयासोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पंचायत’ वेबसीरीजमुळे प्रकाशझोतात आलेली नीना गुप्ता सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. टेलिव्हिजन सीरियल आणि बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या नीना यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. करियरच्या सुरुवातीच्या काळात नीना यांनी फार संघर्ष केला होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना नीना यांचं वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटर आणि कॅप्टन विवियन रिचर्ड यांच्याशी अफेअर सुरु झालं होतं. नीना गुप्ता यांनी त्यांच्या अफेअरला असलेला विरोध धुडकावला आणि नंतरच्या काळात नीना यांनी मुलगी मसाबाला सोबत घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
Master Chef मधील ‘बा’ चे निधन, Urmila Asher यांनी मिळवले फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान!
नीना गुप्ताने ८० च्या दशकात अभिनयसृष्टीत प्रवेश केला. मग ती टीव्हीकडे वळाली. तेव्हापासून ती प्रत्येक घरात ओळखली जाऊ लागली. नीना गुप्ताने आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आलेले पाहिले. पण एक काळ असा होता जेव्हा ती विवियन रिचर्ड्ससोबतच्या प्रेमसंबंधामुळे चर्चेत होती. सिंगल मदर असण्यापासून ते तिच्या अभिनय कारकिर्दीपर्यंत मीडियामध्ये तिच्याबद्दल कायम चर्चा होत राहिल्या. मात्र, वयाच्या 42 व्या वर्षी, नीनाने शेवटी विवेक मेहरा या दिल्लीस्थित चार्टर्ड अकाउंटंटच्या प्रेमात पडली, त्याच्याशी तिने 2008 मध्ये लग्न केले. नीनाचे सर व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतचे नाते कमालीचे राहिले होते. एकदा इन्स्टाग्रामवर फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्सचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले होते.
“कुत्रे आहेत, भुंकणारंच…”, गोविंदाबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनीता आहुजा कोणावर भडकली?
त्यावेळी पुन्हा एकदा सोशल मीडियावर नीना गुप्ता आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांची लव्हस्टोरी चर्चेत आली होती. नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड यांची लव्हस्टोरी १९८० च्या दशकाच्या शेवटी सुरू झाली होती. कर्णधार विवियन रिचर्डच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ एका मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्याकाळी विवियन रिचर्ड यांच्या महिला चाहत्यांची संख्याही मोठ्याप्रमाणावर होती. जेव्हा नीना आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं रिलेशन सुरु होतं, त्या काळी कॅप्टन विवियन रिचर्ड विवाहित होते आणि त्यांना मुलं देखील होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीना आणि विवियन यांची भेट मुंबईतील एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांचं रिलेशनशिप सुरु झालं होतं. नीना गुप्ता प्रेग्नंट देखील झाल्या होत्या. मात्र, विवियन यांच्याशी विवाह करणे नीना यांना शक्य नव्हते.